स्मार्ट ग्राम काटवलीला सहकार्य करू - शिवेंद्रसिंहराजे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

भिलार - ‘‘स्मार्ट ग्राम काटवली या बहुमानासाठी ग्रामस्थांनी केलेली तयारी कौतुकास्पद आहे. काटवलीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. गावाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,’’ 

भिलार - ‘‘स्मार्ट ग्राम काटवली या बहुमानासाठी ग्रामस्थांनी केलेली तयारी कौतुकास्पद आहे. काटवलीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. गावाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,’’ 

अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. काटवली (ता. जावळी) येथे आपले सेवा केंद्र, आयएसओ अंगणवाडी उद्‌घाटन, स्मशानभूमी रस्ता, गावातील मुख्य रस्ता व पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, उपसभापती दत्ता गावडे, जावली बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सुजित शेख, तहसीलदार रोहिणी आखाडे, धर्मराज घोरपडे, अजय शिर्के, स. म. बेलोशे, सरपंच हणमंत बेलोशे आदींची उपस्थिती होती.
श्री. मानकुमरे, गावडे, डॉ. सरकाळे, संजय बेलोशे यांनी मनोगत व्यक्त केले.

पदोन्नतीप्राप्त संजय बेलोशे, साहेबराव गोळे, रविकांत बेलोशे, सूर्यकांत बेलोशे, वैभव पाटील, मोहन बेलोशे, ममता बेलोशे, विक्रम पोरे, मधुकर बेलोशे, धनराज व्हट्टे यांना गौरवण्यात आले.

या वेळी दत्तात्रय सुतार, सदस्या अलका शिंदे, नंदा बेलोशे, मेघा जंगम, सविता बेलोशे, धनश्री शिंदे, गोपाळ बेलोशे, नितीन गावडे, अरविंद कळंबे, दिनकर शिंदे, अंकुश बेलोशे आदी उपस्थित होते. हणमंत बेलोशे व बबनराव शिंदे यांनी स्वागत केले. जगन्नाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अंकुश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Smart Gram Katawali Support Shivendrasinhraje Bhosale