सोलापुरातील लक्ष्मी मार्केटचा "स्मार्ट लूक' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

सोलापूर :  स्मार्ट सिटी एरिया परिसरात असलेल्या लक्ष्मी मार्केटला "स्मार्ट लूक' दिला जाणार आहे. त्यासाठी आठ कोटींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला असून, संकल्पचित्रालाही (डिझाइन) मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त तथा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  दिली. 

स्मार्ट सिटी परिसरात लक्ष्मी मार्केट येत असल्याने या 100 वर्षांपूर्वीच्या मार्केटचे लूक बदलण्याचा प्रकल्प योजनेतून मंजूर करण्यात आला होता. यानुसार याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होते. अखेर लक्ष्मी मार्केटच्या पुनर्विकासासाठी आठ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच या मार्केट परिसरातील विविध प्रकारचे डिझाइन आणि प्लॅन हेही तयार करण्यात आले असून याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. आठ कोटींच्या या पुनर्विकास आराखड्यात इंग्रजकालीन मार्केटच्या इमारतीचे नवे रूप दिसणार आहे. 

भाजीविक्रेते, फळविक्रेते, येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग व्यवस्था, भाजी खरेदी करताना आवश्‍यक विविध सोयीसुविधा, बसण्याची व्यवस्था, विविध प्रकारचे शेड व अन्य बाबींचा समावेश यात आहे. येत्या वर्षभरात याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी आठ कोटी रुपयांच्या या विविध कामांची टेंडर प्रक्रिया जुलै 2018 मध्ये घेण्यात येणार आहे. उत्तम व चांगले काम होण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे डॉ. ढाकणे म्हणाले. 

Web Title: smart look of laxmi market of solpaur