विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ‘स्मार्ट प्लॅन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

सातारा - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमामुळे राज्यातील शिक्षण विभागाची उल्लेखनीय प्रगती झाली असली, तरी सहावी ते आठवी या वर्गातील गणित, इंग्रजी या विषयांत निराशाजनक स्थिती आहे. ती बदलण्याचा विडा शिक्षण विभागाने उचलला असून, त्यासाठी उन्हाळी सुटीत शिक्षकांची प्रशिक्षणे घेऊन त्यातून आराखडा निश्‍चित केला जाणार आहे. वर्षभर त्याची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सातारा येथे राज्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच घेतली. त्यामध्ये सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर असमाधान दिसून आले. श्री. नंदकुमार यांनी सहावी ते आठवीतील शंभर टक्‍के मुले ७५ टक्‍केपेक्षा जास्त गुणांक मिळवणारी बनविली पाहिजेत, या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने तत्काळ पावले उचलली आहेत. ‘डायट’चे प्राचार्य रामचंद्र कोरडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 

सध्या सातारा तालुक्‍यातील २८३ शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. टप्प्याटप्प्याने  सर्व तालुक्‍यांतील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. 

उन्हाळ्याच्या सुटीतही ही प्रशिक्षणे घेतली जाणार आहेत. या प्रशिक्षणातून अध्ययन स्तर निश्‍चितीनुसार विद्यार्थ्यांची प्रगती कशी करता येईल, यासाठी आराखडा बनविला जाणार आहे. पुढे वर्षभर त्याची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना ७५ टक्‍केपेक्षा जास्त गुणांकन मिळेल, यासाठी काटेकोर पावले उचलली जातील. 

25 शिक्षकांची टीम
गणित, भाषा, विज्ञान, इंग्रजी, समाजशास्त्र या विषयांचे जिल्ह्यातून प्रत्येकी २५ तज्ज्ञ संशोधक व्यक्‍तींची (रिसर्च पर्सन) कोअर टीम तयार केली आहे. शिवाय, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारीही त्यांच्या समवेत कार्यरत असणार आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे.

आठवीची गुणवत्ता खालावलेली
नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हेनुसार जिल्ह्यातील आठवीतील मुलांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये गुणवत्ता खालावलेली दिसून आली. एकूण विद्यार्थ्यांच्या ७५ टक्‍केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाषा विषयात ४६.४० टक्‍के, गणितात ६.३४, विज्ञानात ४.९०, तर सामाजिक शास्त्र विषयात ६.१२ टक्‍के प्रश्‍नांची अचूक उत्तरे दिली.

Web Title: Smart plan for students advancement