आबांची कन्या असल्याने न्यायालयात आवाज उठविणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

डान्सबार बंदी साठी आर. आर. पाटील यांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि डान्सबार बंदी आणली. पण आत्ताचे सरकार हे अपयशी ठरले आणि डान्सबारला मान्यता मिळाली. खरच आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल. सरकार कुठे तरी कमी पडले आहे.

सांगली : आत्ताच सरकार हे अपयशी ठरले आणि डान्सबारला मान्यता मिळाली. खरच आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल, अशी खंत आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्यातील पुन्हा डान्सबार सुरु करण्यास परवानगी दिली. डान्स बारमध्ये न्यायालयाने टीप देण्यास परवानगी असून, पैसे उधळण्यास मनाई केली आहे. आघाडी सरकारच्या काळात आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी घातली होती. 

स्मिता पाटील म्हणाल्या, की डान्सबार बंदी साठी आर. आर. पाटील यांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि डान्सबार बंदी आणली. पण आत्ताचे सरकार हे अपयशी ठरले आणि डान्सबारला मान्यता मिळाली. खरच आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल. सरकार कुठे तरी कमी पडले आहे. ज्या पूर्तता कोर्टात सादर कराव्या लागणार होत्या त्या पूर्तता या सरकारने केल्या नाहीत. मी आबांची कन्या म्हणून याच्यावर आवाज उठवणार आहे.

Web Title: Smita Patil talked about Dance bar ban in Maharashtra