पोलिस प्रशिक्षण केंद्रात आढळला दुर्मिळ प्रजातीचा रसल कुकरी साप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी अकबर शेख यांना वसाहत परिसरात शनिवारी सायंकाळी एक वेगळाच साप दिसला. त्यांनी त्या सापाला अगदी शिताफीने बाटलीमध्ये बंद केले आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना कळविले. श्री. क्षीरसागर यांनी पोलिस प्रशिक्षण केंद्रात जाऊन साप ताब्यात घेतला.

सोलापूर : केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील वसाहतीच्या परिसरात दुर्मिळ प्रजातीचा बिनविषारी रसल कुकरी साप आढळला. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी त्या सापाला सुरक्षितपणे पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडले. 

पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी अकबर शेख यांना वसाहत परिसरात शनिवारी सायंकाळी एक वेगळाच साप दिसला. त्यांनी त्या सापाला अगदी शिताफीने बाटलीमध्ये बंद केले आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना कळविले. श्री. क्षीरसागर यांनी पोलिस प्रशिक्षण केंद्रात जाऊन साप ताब्यात घेतला. साप पाहिल्यावर तेथील नागरिकांना सापाच्या प्रजातीची माहिती देण्यात आली. हा दुर्मिळ असा रसल कुकरी प्रजातीचा बिनविषारी साप असल्याचे सांगण्यात आले. साधारण दीड फूट लांबीचा साप नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आला. या वेळी श्री. क्षीरसागर यांच्यासह सोमानंद डोके, संतोष धाकपाडे उपस्थित होते. 

2007 मध्ये बाळे परिसरात रसल कुकरी साप दिसला होता. त्यानंतर तो आताच दिसला आहे. गवतावरील किडे, आळ्या, नाकतोडे, छोटे बेडूक हे त्याचे खाद्य आहे. हा साप बिनविषारी असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: snake found in police training center at Solapur