कठीण आहे बाबा...! शासकीय कार्यालयांकडेच "इतक्‍या' कोटींची थकबाकी 

कठीण आहे बाबा...! शासकीय कार्यालयांकडेच "इतक्‍या' कोटींची थकबाकी 

सोलापूर ः शहरातील शासकीय कार्यालयांकडेच मिळकत कराची सुमारे 16 कोटी 38 लाखांची थकबाकी आहे. दरम्यान, थकबाकीपोटी शहरातील मिळकतदारांचे आतापर्यंत 39 नळजोड बंद करण्यात आले असुन, सुमारे 1 कोटी 11 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे प्रशिक्षणासाठी गेल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडेच महापालिकेचा अतिरीक्त पदभार आहे. 

महापालिकेचे दुटप्पी धोरण 
सर्वसामान्य नागरिकांकडे असलेली थकबाकी वसुलीसाठी महापालिका धडक मोहिम राबवून प्रसंगी जप्तीची मोहिम राबवते, त्याचवेळी शासकीय कार्यालयाबाबत मात्र तितक्‍या गांभीर्याने कारवाई केली जात नाही. महापालिका प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणाबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयांकडे असलेली थकबाकी ही एका वर्षाची नाही, मग महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष का करते, असा सर्वसामान्य सोलापूरकराचा आहे. 

उत्पन्न वाढले 10 कोटींनी 
सोमवारी पश्‍चिम मंगळवार पेठेत वसुली मोहिम राबविण्यात आली. तीन नळजोड बंद करून 3.42 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत 60 लाख 50 हजार 161 रुपये नियमित आणि 50 लाख 94 हजार 070 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. 1 एप्रिलपासून आजअखेर 51 कोटी 34 लाख 50 हजार 115 रुपयांची वसुली करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत 40 कोटी 97 लाख 19 हजार 017 रुपयांची वसुली झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली 10 कोटीने जास्त आहे. 

शासकीय कार्यालयांकडे असलेला थकीत मिळकत कर 
जिल्हाधिकारी (59 लाख 12 हजार 234 रुपये), पोलिस आयुक्त कार्यालय (2 कोटी 12 लाख 47 हजार 640), रेल्वे (12 कोटी 04 लाख 43 हजार 754- आता सेवाशुल्क लागू झाल्याने फक्त 2 कोटी रुपये), रेल्वे केंद्रीय विद्यालय (71 लाख 61 हजार 133), आयटीआय (10 लाख 61 हजार 133) आणि पाटबंधारे-उजनी (80 लाख 31 हजार 303).

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com