पुसदच्या भक्ताने दिले विठ्ठलाला एवढे सोने

अभय जोशी
Thursday, 19 December 2019

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील श्रीराम कोंडोपंत पापेनवार (वय 75) हे विठ्ठल भक्त भाविक गेल्या काही दिवसापासून अर्धांग वायूमुळे आजारी आहेत. त्यांच्याकडील १० तोळे सोने त्यांना विठुरायाच्या चरणी अर्पण करावयाची इच्छा होती. परंतु आजारपणामुळे ते पंढरपूरला येऊ शकत नव्हते.

पंढरपूर (सोलापूर) : पुसद येथील वृद्ध भक्ताने १० तोळे सोने श्री विठ्ठल चरणी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी पुसद येथे जाऊन भाविकाकडील सोने मंदिर समितीसाठी स्वीकारून त्यांची इच्छा पूर्ण केली, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी यांनी दिली.

हेही वाचा : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची ‘खिचडी’
माजी अर्थमंत्र्यांच्याचे विशेष कार्य अधिकाऱ्याशी संपर्क

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील श्रीराम कोंडोपंत पापेनवार (वय 75) हे विठ्ठल भक्त भाविक गेल्या काही दिवसापासून अर्धांग वायूमुळे आजारी आहेत. त्यांच्याकडील १० तोळे सोने त्यांना विठुरायाच्या चरणी अर्पण करावयाची इच्छा होती. परंतु आजारपणामुळे ते पंढरपूरला येऊ शकत नव्हते. मागील चार- पाच दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. भजनावळे यांच्याशी संपर्क साधून कोणत्याही परिस्थितीत विठुरायाच्या चरणी सोने अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

हेही वाचा : एसटीच्या नगर विभागाने कात टाकली
पापेनवार यांचा सत्कार

श्री. भजनावळे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे यासंदर्भात संपर्क साधला होता.  नागपूर येथील अधिवेशनाच्या निमित्ताने मंदिर समितीचे लेखा अधिकारी सुरेश कदम हे नागपूर येथे असल्याने त्यांनी पुसद येथे जाऊन श्री पापेनवार यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी दहा तोळे सोने स्वीकारले. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पापेनवार यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

आजारी असलेल्या वडिलांची इच्छा पूर्ण झाल्यामुळे श्री. पापेनवार यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ऋण व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So much gold given by the devotee of Pusad