आयुक्तासमोर नारळ फोडून त्यांची पूजा करु

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 16 मे 2018

सोलापूर - विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "आयुक्तांसमोर नारळ फोडून त्यांची पूजा करू आणि वेळेवर पाणी देण्यासाठी साकडं घालू' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक राजू पिल्ले यांनी नोंदवली आहे. नगरसेवक संतोष भोसले व गुरुशांत धुत्तरगावकर यांनीही विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत संताप व्यक्त करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 

पाणी असतानाही शहराला चार दिवसांआड पाणी मिळत आहे. अशा स्थितीत पाणीटाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. हा प्रकार गेल्या शुक्रवारी झाला. त्याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही चर्चा झाली. पण संबंधितांकडून साधा खुलासा मागविण्याचे धाडस वरिष्ठांना झाले नाही. शासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत माध्यमातून चौफेर टीका झाल्यावर त्याची दखल घ्यावी लागली. या टाकीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसत असतानाही कागदी घोडे नाचविण्याकडे प्रशासनाचा कल आहे. अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई होईल की नाही याबाबत साशंकताच आहे. या सर्व घडामोडींमुळे पाण्याअभावी सोलापूरकरांचे हाल मात्र निश्‍चित आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहराला पाण्याचा प्रश्‍न भर उन्हाळ्यात सतावत असून नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाले आहेत. शहराला चार ते पाच दिवसाला येणारे पाणी वेळेवर येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दररोज पाणी देता येत नसेल तर नका देऊ पण किमान चार दिवासांआड मिळणारे पाणी हे वेळेवर मिळायला हवे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. 

आयुक्तांच्या घरासमोर लावणार रांगा 
पिण्याचे पाणी कधीच वेळेवर येत नाही. कधी रात्री उशिरा, कधी रात्री 12 च्या नंतर, कधी पहाटे चार वाजता, कधी सकाळी आठ वाजता तर कधी भर उन्हात 12 वाजता पाणी सोडत आहेत. नागरिकांची सकाळी कामाला जाण्याची वेळ असते. वेळेवर पाणी न सोडल्यास आयुक्तांच्या घरासमोर पाण्यासाठी रांग लावू, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

Web Title: soalpur news water Citizen stricken by disrupted water supply