युवकांनी साजरी केली पालावरच्या मुलांसोबत दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

सोलापूर : बाळे परिसरातील पालावरील मुलांसोबत तरुण मित्रांनी दिवाळी साजरी केली.

समाजापासून वंचित असणाऱ्या मुलांच्या सहवासात केदार पुजारी, रणजीत शेळके, चिदंबर कारकल, सोमनाथ हिंगमीरे, श्रीकांत पाटील, नवराज होनमुर्गीकर आदी  मित्रांनी वेळ घालवून एक वेगळा संदेश दिला आहे.

ज्यांना रोज पोटासाठी वणवण करावी लागते त्या लहानग्यांना फराळ दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात न सांगण्यासारखा होता असे रणजी शेळके यांनी सांगितले.

काचे मागच्या  मिठाईला नुसत्या  डोळ्यांनी स्पर्श करून सुखावलेल्या गरीब डोळ्यांना  चवीचे सुख मिळावे यासाठी हा उपक्रम आयोजिला होता. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाबद्दल आपण काही तर देण लागतो. या सामाजिक जाणिवेतून या वर्षी दिवाळीत समाजातील भटक्या विमुक्त जाती समाजातील मुलांनाही दिवाळी साजरी करता यावी त्यांना ही  आपल्या सारखं फराळचा आस्वाद घेता यावा यासाठी आम्ही मित्रांनी फराळ एकत्रित करून पालावरच्या मुलांना दिल्याचे केदार पुजारी यांनी सांगितले.

Web Title: Social awareness on Diwali by Solapur youths