सोशल मिडियावर मेसेज फॉरवर्ड करा विचारपूर्वक

social media is dangers
social media is dangers

मंगळवेढा - व्हॉट्सऍपवरून मुले पळविणाऱया टोळीबाबत खातरजमा न करता विविध ग्रुपवर फॉरवर्ड केल्यामुळे तालुक्यातील खवे येथील भारत भोसले, दादाराव भोसले, भारत मालवे, अगनू इंगोले रा. मानेवाडी, राजू भोसले रा. गोंदवून (कर्नाटक) यांना आपला जीव गमवावा लागला. असे व्हिडीओ व अफवा न पसवण्याचे पोलीस खात्याचे संदेश देखील आता सोशलमिडीयात पसरत असून त्यांचबरोबर धुळे घटनेची व्हीडीओ सुध्दा पसरत आहेत. या घटनेचा अन्यत्र फारवर्ड दुरुयोग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे  याकडे लक्ष देवून कडक कारवाईबाबत पोलीसांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.शिवाय जागरूक नागरिकानी देखील अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

तालुक्यातील सोळा गावातील नाथपंथीय डवरी समाजातील भीक्षा मागून कुटुंबाची गुजरान करता असतात त्यांच्याकडे लोकप्रतिनिधीचे पत्र, आधारकार्ड व स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेतल्याची कागदपत्रे असताना देखील केवळ व्हायरल पोस्ट मुळे यावर कोणीही विश्वास न ठेवता त्यांना ठेचून मारण्यात आले.सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. 

आपल्याबाबत असा काही प्रकार घडेल याची त्यांना कल्पनाही नसावी राज्यसह देशभरात आतापर्यंत मुले पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या मात्र, सोशल मीडियावरील व्हायरल होणार्‍या अफवांमुळे गावकर्‍यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोशल मिडीयावरून असा अपप्रचार कोण करतो अन् माहितीची खातरजमा न करता तो फॉरवर्ड करणारेसुद्धा तितकेच दोषी आहेत. त्यामुळे गावपातळीवर ग्रामसुरंक्षा दल,सामाजिक संघटना,सुशिक्षित मंडळींनी गावकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरजेचे आहे. पालकही मुलाच्या हौसेकडे लक्ष देवून मुलाच्या करिअरकडे लक्ष न देता चांगले मोबाईल घेवून देतात मुले काय करतात याकडे लक्ष देत नाही चुकीचे संदेशामुळे ग्रामस्थाच्या मनात मनात भीती निर्माण होते एक वर्षापुर्वी जिल्हयातही अशा अफवाचे पिक आले होते.पण पोलीसांच्या दक्षतेमुळे आणि जागरुक नागरिकामुळे जिल्हयात अनर्थ होईल अशी घटना घडली नाही.

नागरिकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये. जर अशी व्यक्ती आढळली तर पोलीसाशी संपर्क साधण्याचे आवाहन तर केलेच त्यातूनही चुकीचे मेसेज फारवर्ड करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी यावेळी सांगितले आहे.

त्याचबरोबर, 45 वर्षे गावात राहून काय साधले भिक्षा मागून कुटूंब चालविले. आता हत्या प्रकरणाने घाबरलो असून जगायचे कसे. इथे राहून काय या माळावरचे खडे खायचे काय? शेवटी मदतीचे हात चार दिवसापुरते असतात. आमचा वाली कुणी नाही. शासनाने आता तरी विचार करावा.
असे मत या समाजाच्या सुखदेव भोसले यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com