सदाभाऊ खोतांच्या व्हायरल व्हिडिओमागील काय आहे सत्य तुम्हीच पाहा आणि ठरवा !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सध्या सोशल मीडियावर मंत्री सदाभाऊ खोतांविषयी प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदाभाऊ खोत यांचा एक व्हिडिओदेखिल खूप व्हायरल होत आहे.

सांगली : कोल्हापूर आणि सांगलीत महापूराने थैमान घातलेले असताना सरकारची नौटंकी काही केल्या थांबत नाहीये. सध्या सोशल मीडियावर मंत्री सदाभाऊ खोतांविषयी प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदाभाऊ खोत यांचा एक व्हिडिओदेखिल खूप व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओमध्ये बोटीतील हिरव्या रंगाच्या कोटमधील व्यक्ती प्रथम बोटीत दिसत आहे त्या व्यक्तीला पुरातील घरावर सोडून पुन्हा बोटीत घेतल्याचे नाटक करून मंत्री सदाभाऊ खोत यांनी बेगडी ड्रामा केला असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे.

सदाभाऊंच्या धाडसाने तीन जणांचा जीव वाचला!

परंतु सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याची सत्यता पडताळून पाहताना लक्षात येते की व्हायरल व्हिडिओ एडिट करून याचा क्रम चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करातसेच हा व्हिडिओ आज व्हायरल झाला आहे परंतु, सदाभाऊ खोत यांनी ही पोस्ट शुक्रवारी म्हणजेच 09 तारखेला अपलोड केलेला आहे. सदाभाऊ खोतांच्या फेसबुक वॉलवरील व्हिडिओ पाहिल्यास हे सर्व लक्षात येते. सदाभाऊ खोत यांची फेसबुक पोस्ट पाहून आता तुम्हीच ठरवा काय सत्य आणि काय असत्य !

सदाभाऊ खोत यांची फेसबुक पोस्ट आणि व्हिडिओ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social media erupts Minister Sadabhau Khot Video viral