गावकरी जावई अन्‌ भटजी झाले सासरे

विलास कुलकर्णी
मंगळवार, 29 मे 2018

राहुरी फॅक्‍टरी - गावकरी झाले जावई, गावाचे भटजी झाले सासरे, असे चित्र गुहा (ता. राहुरी) येथे पाहायला मिळाले. १०८ दांपत्यांची पूजा, त्यांना तेरा वस्तूंचे दान. संपूर्ण गावकऱ्यांना मिष्टान्न भोजन, असे अधिक मासाचे पुण्यकर्म सोमनाथ कुलकर्णी यांनी केले. 

व्यतिपात, शनिप्रदोष, द्वादशी असा अधिक मासातील दुग्धशर्करा योग कुलकर्णी गुरुजींनी शनिवारी साधला. घरोघर आमंत्रणे दिली. हनुमान मंदिरात १०८ दांपत्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा केली. महिलांची ओटी भरून दान व वाण दिले. डाळबट्टी, साजूक तूप, बदामाचा गोडाचा शिरा, पुलाव, पापड, चटणी अशी मेजवानी ठेवली. महिला व पुरुषांच्या स्वतंत्र पंगती केल्या. जोडीला भक्तिगीतांचा कार्यक्रम ठेवला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन दांपत्यांनी मिष्टान्नाचा आस्वाद घेतला. ब्राह्मण कधी सत्यनारायण पूजा व अन्नदान करीत नाहीत, हा अपप्रचार सोमनाथ व सीमा कुलकर्णी या दांपत्याने खोडला. पंचक्रोशीतील ब्रह्मवृंद या धोंड्याला उपस्थित राहिले. 

माझ्यासह गावातील सर्व मुस्लिम समाजाने भोजन केले. गुरुजींनी सामाजिक एकतेचे दर्शन घडविले, असे कार्यक्रम नियमित आयोजित करायला हवेत.
- शौकतअली सय्यद, ग्रामस्थ, गुहा

Web Title: Social unity in guha rahuri taluka