अक्कलकोट: हत्ती तलावाचा कायापालट

राजशेखर चौधरी
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

या तलावाची आणखी अपेक्षित कामे
तलावाच्या तिन्ही बाजूस पडझड झालेल्या भिंतीची दुरुस्ती करणे आणि त्याची उंची वाढविणे, संरक्षक दगडी भिंतीस रंगरंगोटी करणे, तलावात मध्यभागी रंगीत कारंज्याची निर्मिती करणे, स्वामी भक्तांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देणे,या तलावाच्या परिसरात पेव्हर ब्लॉक, एल ई डी दिवे आणि बसण्यास बाकडे बसविणे तसेच तलावाच्या दक्षिण बाजूस रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे उभे करणे आदी कामे जर पूर्ण झाली तर निश्चितच शहरात एक चांगली गोष्ट पूर्णत्वास जाईल यात शंका नाही.पण यासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात होऊन आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

अक्कलकोट : जयहिंद फूडबँक पुढाकारातून आणि सात विविध सामाजिक संघटनेच्या मदतीने लोकसहभागातून आज पंचवीस हजार रुपये खर्च करून हत्ती तलावाचा कायापालट करण्यात करण्यात आला. हा तलाव एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून पुढे येण्यासाठी या ठिकाणी आणखी मोठी कामे होणे अपेक्षित आहे. यासाठी खूप मोठा खर्च येणार आहे, ही सर्व कामे येत्या काळात पूर्ण होण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येत मदत करावे असे आवाहन जयहिंद फूडबँकेचे अध्यक्ष अंकुश चौगुले व सदस्यांनी केले आहे.

आज सकाळी दहा वाजता सोलापूरहून पोकलेन मशीन आणून दिवसभर हत्ती तलाव परिसर स्वच्छता, झाडे आणि झुडुपे काढणे आणि तलावातील गाळ काढणे आदी कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या कामासाठी आज साई समर्थ प्रतिष्ठान, रिद्धी सिद्धी प्रतिष्ठान, श्री संत ककय्या महाराज युथ फाउंडेशन, वडार समाज सामाजिक संस्था, श्रीराम सेना, शिवशंभू प्रतिष्ठान, श्री संत ककय्या बहुउद्देशीय महाराज संस्था आदींनी आर्थिक मदत करून २५ हजाराचा निधी उभा केला आणि हत्ती तलावाचे काम करण्यात आले.

दरम्यान आज सकाळी मशीनचे विधिवत पूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी अंकुश चौगुले, हिरा बंदपट्टे, अशोक जाधव, विश्वनाथ मंजुळे, आतिष पवार, चेतन शिंदे, सचिन कलबुर्गी, म्हाळपा चौगुले, आनंद चौगुले, विजय तडकलकर, सिद्धाराम चौगुले, आनंद पवार,महेश लिंबोळे उत्तम इंगळे, अंबादास पवार, दत्तात्रय कवठे, दत्तू मेंथे आदींसह संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या तलावाची आणखी अपेक्षित कामे
तलावाच्या तिन्ही बाजूस पडझड झालेल्या भिंतीची दुरुस्ती करणे आणि त्याची उंची वाढविणे, संरक्षक दगडी भिंतीस रंगरंगोटी करणे, तलावात मध्यभागी रंगीत कारंज्याची निर्मिती करणे, स्वामी भक्तांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देणे,या तलावाच्या परिसरात पेव्हर ब्लॉक, एल ई डी दिवे आणि बसण्यास बाकडे बसविणे तसेच तलावाच्या दक्षिण बाजूस रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे उभे करणे आदी कामे जर पूर्ण झाली तर निश्चितच शहरात एक चांगली गोष्ट पूर्णत्वास जाईल यात शंका नाही.पण यासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात होऊन आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

Web Title: social work in Akkalkot