दिलीपराव ठुबे प्रतिष्ठाण सामाजिक कामात अग्रेसर

सनी सोनावळे
शुक्रवार, 6 जुलै 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : ज्यांचे वडील अपघात गेले आहेत त्यांच्या मुलासंह शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, गावातील नागरिकांना सरकारी योजनांमधून मदत करणे यासंह अन्य कामांच्या माध्यमातून दिलीपराव ठुबे प्रतिष्ठाण सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असते असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र ठुबे यांनी केले.

कान्हुर पठार (ता.पारनेर) येथे आयोजित महाराष्ट्र इमारत व इतर बांंधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांच्या पाल्यानां नुुकतेेेच शैक्षणिक पुुुस्तकाचे वााटप करण्यात आले. त्यावेळी ठुबे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सुविधा केंद्राचे संचालक सुभाष ठुबे होते. ठुबे म्हणाले, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा फायदा घ्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नवले, छाया ठुबे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप ठुबे, प्रसाद शेळके, बबन गुंमटकर, साळवे देवदत्त, पांडुरंग वाघूडे, बाळासाहेब घोडके उपस्थित होते. वाटप करण्यात आलेल्या पुस्तक संचामध्ये डिक्शनरी, स्पीकवेल इंग्लिश, चालू घडामोडी यांच्यासह नऊ पुस्तकांचा समावेश आहे. 

Web Title: social work diliprao thube pratishthan