सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांचे बेमुदत उपोषण

agitation
agitation

पारनेर (नगर) : जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून सिध्देश्वर ओढयातील वाळू एक बंधारा बांधून देण्याच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात उपसा करूनही महसुल विभागाने कोणतीच कारवाई केली नाही. उत्खननाचे पंचनामे करूण संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा तसेच सरकारचा बुडालेला महसुल संबंधितांकडून वसुल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे हे बेमुदत उपोषणास बसले आहेत.

परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून घावटे हे दोन जुलै पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. वाळू उत्खनन सुरू असताना महसुल विभागाने बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप त्यांनी पत्रकात केला आहे. 

जो पर्यंत कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे घावटे यांनी सांगितले. यावेळी पाठिंबा देण्यासाठी निघोज दारु बंदी चळवळीचे कार्यकर्ते  बबन कवाद सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, भानुदास साळवे, संजय वाघमारे, सचिन नगरे, तुषार औटी रंजना पठारे, ज्ञानदेव पठारे, महेंद्र पठारे, प्रभाकर घावटे, गंगाधर सालके, बाबाजी गाडीलकर, नामदेव रसाळ, भाऊसाहेब आढाव, मंगेश सालके, संतोष सालके, रमेश सालके आदींनी पाठिंबा दिला आहे.

आज (ता. 3) सकाळी पारनेरचे सभापती राहुल झावरे, ऊपसभापती दीपक पवार, पारनेरचे माजी ऊप नगराध्यक्ष अनिकेत औटी, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे आदींनी घवटे यांची भेट घेतली व महसुल विभागाने पर्यावरणाचा अशा तऱ्हेने ऱ्हास होत असताना लक्ष देऊन संबधीतांवर कारवाई करणे गरजेचे आहे. व अवैध वाळू उपशाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रीया दिली.

दरम्यान आज तहसीलदार भारती सागरे यांनी आपण उपोषण करत असल्याचे वृत्तपत्रातून समजले मात्र वाळू उपसा करणाऱ्या लोकांची नांवे ग्रामस्थांनी किंवा आपण सांगावीत आम्ही तात्काळ गुन्हे दाखल करू. तसेच हा बंधारा सुमारे दीडवर्षापुर्वी झाला आहे. आम्ही येथील वाळू उपसा होत असल्याचे समजल्यावर तेथे पंचनामा करण्यासाठी गेलो त्या वेळी ते खड्डे पाण्याने भरलेले होते. येथील वाळू उपशाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही येथे वाळू उपसा होऊ दिला नाही. तसेच आपल्या म्हणण्यानुसार अता नेमका गुन्हा कोणावर व किती ब्रास वाळू ऊपसा केल्याचा दाखल करावयाचा असा प्रश्न निर्माण झाल्याने तसेच आपण उपोषण करत असलेली जागा धोकादायक असल्याने आपण उपोषण मागे घ्यावे असे लेखी पत्र दिले घावटे यांना दिले मात्र त्यांनी ते स्विकारले नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com