सोलापूर : सोलापूर शहरात एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या गळफास घेऊन आत्महत्या केली असून, सोलापूर जवळील कुमठे गाव परिसरात झुडुपात त्याचा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे ग्रामस्थांनी पाहणी केली असता. त्याचा मृतदेह आढळून आला आहे

दहा दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशातील प्रकासम येथून बेपत्ता झालेल्या स्वॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी मिळाला. कुमठे परिसरातील वन विभागाच्या जागेत ही घटना घडली आहे. मधूबाबू साने (वय 37, रा. प्रकासम, आंध्रप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मधूबाबू हा दहा दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडला होता. कुमठे गाव परिसरातील झुडपामध्ये शनिवारी सकाळी मधूबाबूचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. सात-आठ दिवसांपूर्वी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. मृतदेह सडल्याने वास येत होता. त्याच्या खिशातील आधारकार्डावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या गावाकडे कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. नातेवाईक सोलापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समलले नाही, चौकशी सुरू आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांनी सांगितले.