बालकलाकार सोहम करतोय मोदींचा पपेट शो! 

परशुराम कोकणे
बुधवार, 17 एप्रिल 2019

निवडणुकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेत असल्याने चौकीदार विषयावरून संवाद बनवून सोहम पपेट शो करत आहे. सोमवारी रात्री त्याने एका कार्यक्रमात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासमोर मोदींचा पपेट शो सादर करून वाहवा मिळविली.

सोलापूर : कन्ना चौक परिसरातील बालकलाकार सोहम येमूल याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पपेट बनविला आहे. गेल्या चार दिवसांत त्याने अनेक ठिकाणी पपेट शो केला असून मोदींनी केलेल्या कामांची माहिती याद्वारे दिली जात आहे. 

सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेल्या श्‍याम येमूल यांनी मुलगा सोहम याला बोलक्‍या बाहुल्यांचा खेळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आठ वर्षांचा सोहम गेल्या वर्षभरापासून विविध विषयांवर पपेट शो करत आहे. त्याच्या कलाकारीचे शाळेत आणि समाजातून कौतुक होत असते.

निवडणुकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेत असल्याने चौकीदार विषयावरून संवाद बनवून सोहम पपेट शो करत आहे. सोमवारी रात्री त्याने एका कार्यक्रमात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासमोर मोदींचा पपेट शो सादर करून वाहवा मिळविली.

Web Title: soham yemul campaign for narendra modi