मुलीचे लग्न लावून देण्यास नकार देणाऱ्या पित्याचा खून 

परशुराम कोकणे
सोमवार, 26 मार्च 2018

सोलापूर - मुलगी अल्पवयीन असल्याने आताच माझ्या मुलीचे लग्न करणार नाही, असे म्हणणाऱ्या पित्याचा बिअरची बाटली डोक्‍यात मारून खून केल्याची घटना एसएलबी रिक्षास्टॉप मागील म्हसोबा मंदिराजवळ घडली. 

सोलापूर - मुलगी अल्पवयीन असल्याने आताच माझ्या मुलीचे लग्न करणार नाही, असे म्हणणाऱ्या पित्याचा बिअरची बाटली डोक्‍यात मारून खून केल्याची घटना एसएलबी रिक्षास्टॉप मागील म्हसोबा मंदिराजवळ घडली. 

विनोद ऊर्फ खंडू प्रभाकर जाधव (रा. भैरुवस्ती सुशील मराठी शाळेजवळ, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रदीप मौला गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. विनोद यांना 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे. तिचा विवाह आरोपी प्रदीप मौला गायकवाड याने त्याचा भाऊ संदीप मौला गायकवाड याच्याशी करून दे, अशी मागणी केली होती. जाधव पती-पत्नीने यास नकार कळवला होता. यामुळे आरोपी प्रदीप मौला गायकवाड हा विनोद आणि त्याच्या पत्नीवर चिडून होता.

दरम्यान 6 मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास विनोद एसएलबी रिक्षा स्टॉप मागील म्हसोबा मंदिराजवळून पायी जात असताना आरोपी प्रदीप तिथे आला. त्याने विनोदला तुझ्या पत्नीला फार मस्ती आली आहे, तुझ्या मुलीचे माझ्या भावासोबत लग्न का करून देत नाही म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या बिअरच्या बाटलीने विनोद यांच्या डोक्‍यात मारून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान शनिवारी विनोद यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Solahpur News refuse to marriage murder of father