पंचवीस लाखांचे गोमांस जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सोलापूर : सोलापूरमार्गे मुंबईच्या दिशेने निघालेले 25 लाख 40 हजारांचे गोमांस पोलिसांनी जप्त केले. गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर : सोलापूरमार्गे मुंबईच्या दिशेने निघालेले 25 लाख 40 हजारांचे गोमांस पोलिसांनी जप्त केले. गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कंटेनर चालक विठ्ठल तुकाराम ढवळे (वय 29, रा. बावलगाव ता. चाकूर जि. लातूर) याने कंटेनर मालक शंकर शिंदे याच्या सांगण्यावरून इंद्रजीतसिंग ठाकूर (रा. नळदुर्ग जि. उस्मानाबाद) याच्याकडून गोमांस घेतले. 25 लाख चाळीस हजारांचा गोमांस कार्टूनमध्ये बंद करून कंटेनरमध्ये ठेवला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. कंटेनर थांबवून चौकशी केली. मार्कट यार्ड चौकात ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: solapur