सोलापूर बार असोसिएशन निवडणूकीत न्हावकरांसह दिग्गजांची नावे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

सोलापूर - जिल्हा सरकारी वकील पदाच्या जबाबदारीनंतर आता संतोष न्हावकर यांनी सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणूकीत उडी मारण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्षपदासाठी त्यांच्यासह माजी अध्यक्ष शिवशंकर घोडके, राजेंद्र फताटे, सुरेश गायकवाड यांचीही नावे चर्चेत आहेत. 

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूकीसाठी 24 जुलै रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 21 जुलै ही वर्गणी स्वीकारण्याची अंतीम तारीख आहे. 26 रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध, 27 ते 30 जुलै या कालावधीत अर्ज विक्री व स्वीकारणे, 31 जुलै रोजी अर्जांची छाननी होईल, 2 ऑगस्ट रोजी अंतीम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. 6 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेत मतदान होईल. सायंकाळी पाचनंतर मतमोजणीला सुरवात होईल. 8 ऑगस्ट रोजी नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे. विद्यमान अध्यक्ष एच.एम.अंकलगी यांनी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

निवडणूकीसाठी पॅनल तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर हे दोनच दिवसात पॅनल जाहीर करणार आहेत. त्यांच्यासह माजी अध्यक्ष शिवशंकर घोडके, राजेंद्र फताटे, सुरेश गायकवाड यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. निवडणूकीच्या रिंगणात कोण-कोण आपले नशीब अजमावणार आहे हे लवकरच दिसून येईल. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बार असोसिएशनवर कोणाचे वर्चस्व राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Solapur Bar Association elections