सोलापूर शहर व परिसरात  शहीद दिनाचे विविध कार्यक्रम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

सोलापूर महानगरपालिका

 कौन्सिल हॉल येथे त्यांच्या प्रतिमेस महापौर शोभा बनशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, गटनेते आनंद चंदनशिवे,उपायुक्त अजयसिंह पवार, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, श्रीनिवास पुरुड,कामगार कल्याण अधिकारी विजय कांबळे,आर डी गायकवाड, अशोक खडके, नागनाथ जाधव, उपस्थित होते. 

सोलापूर ः शहिद दिनानिमित्त शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिकेत दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारताचे थोर सुपुत्र व सोलापूरचे माजी पोलिस आयुक्त अशोक कामटे मुंबईतील एटीएस पथकाचे प्रमुख पोलिस अधिकारी हेमंत करकरे, चकमकफेम गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय साळसकर, सोलापुरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 चे जवान राहुल शिंदे, एनएसजी मधील मेजर संदीप उन्नीकृष्णन हे शहीद झाले होते. त्यांचे आदर्श व त्यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी दर वर्षी 26 नोव्हेंबरला शहीद दिन साजरा करण्यात येतो.

हेही वाचा... पोलिस सज्ज आहेतच, नागरिकांनीही रहावे दक्ष

पोलिस आयुक्तालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी शहीद अधिकाऱ्यांना अभिवादन केले. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध संघटनांच्या वतीनेही शहीद दिनानिमित्त अभिवादनाचे कार्यक्रम आयोजिण्यात आले. आज सायंकाळी कॉंग्रेसच्या वतीने शहीद दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. महाराष्ट्र 

हेही पहा... महापालिकेत अभिवादन आणि 26 नोव्हेंबर घटनाक्रम (व्हिडीओ) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur city and locality Various events of Martyrs Day