सोलापूर शहरात  21 'ब्लॅक स्पॉट' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. राधाकृष्णन यांची समिती नियुक्ती केली होती. या समितीने रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना सुचविण्यातील दिल्लीतील इंटिग्रेटेड मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टिम या संस्थेची नियुक्ती केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिका क्षेत्रातील अपघातप्रवण परिसरात आवश्‍यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शासनाने महापालिकांना हे आदेश दिले आहेत. 

इंडियन रोड कॉंग्रेसच्या मानकानुसार ही समिती रस्ता सुरक्षेचा अहवाल तयार करणार आहे. प्रस्तावित रस्त्यांची वर्षातून दोनदा पाहणी व तपासणी केली जाणार आहे. अहवालातील शिफारशीनुसार संबंधित महापालिकांना आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने कराव्या लागणार आहेत. अपघातप्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) दुरुस्ती प्राधान्याने केली जावी. त्या ठिकाणी अपघात होऊ नयेत यासाठी काय करावे, याच्या शिफारशी केल्या जाव्यात व महापालिकने तातडीने त्याची अंमलबजावणी करावी. समितीने सुचविलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्तांवर टाकण्यात आली आहे. 

महापालिका हद्दीत 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी शासनाच्या सूचनेनुसार उपाययोजना करण्यात येतील. 
- संदीप कारंजे, नगरअभियंता, सदस्य-सचिव, ब्लॅक स्पॉट समिती 

ही आहेत ब्लॅक स्पॉटची ठिकाणे 
केगाव, बाळे चौक, जुना पुणे नाका, एसटी स्थानक, मार्केट यार्ड, चंदन काटा, जुना बोरामणी नाका, शांती चौक, जुना विजयपूर नाका, आयटीआय पोलिस चौकीसमोर, इंचगिरी मठासमोर, सैफुल चौकी, एसआरपी कॅम्प चौक, सोरेगाव चौकी, दशमेश पेट्रोल पंप, जुना अक्कलकोट नाका, आसरा चौक, सात रस्ता, मुळेगाव क्रॉस रोड, जुना तुळजापूर नाका, देगाव टोल नाका. 

Web Title: solapur city black spot news