ताईहट्टामुळं भाजपसाठी अरिफ झाला ‘शरीफ’!

ताईहट्टामुळं भाजपसाठी अरिफ झाला ‘शरीफ’!

राजकारण्यांच्या मुला-मुलींना मिळालेली प्रतिष्ठा जनतेमुळं आहे, याचं भान नसतं. लातुरात दिलीपराव देशमुखांनी विधान केलं की आमच्या घरातली लहान पोरंसोरंसुद्धा लालदिव्याच्या गाडीशी खेळतात. म्हणजे मंत्रिपदाची दर्पोक्ती त्यातून दिसून येते. सोलापुरात प्रणितीताई शिंदे यांनी तसं विधान वगैरे केलं नाही, पण आपला जुना वचपा काढण्यासाठी पक्षापासून माणसं तोडण्याचं काम सुरू केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’नं त्यांच्या नाकात दम आणला होता. शेवटपर्यंत त्यांना विजयाची खात्री मिळत नव्हती. पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्याच तौफिक शेख आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या काँग्रेसजनांमुळं प्रणितीताईंना त्रास झाला. माजी महापौर अरिफ शेख हे तौफिक यांचे बंधू. त्यामुळं आता महापालिकेत अरिफ शेख नको, असं ताईंनी ठाम सांगितलं. शहरात आधीच तोळामासा झालेल्या काँग्रेस पक्षाचा निवडून येऊ शकणारा उमेदवार ‘ताईहट्टा’पायी गमावला आहे. ताईंमुळंच काँग्रेस सोडण्याची नामुष्की आल्याचं शेख यांचं म्हणणं आहे. आता, त्यांची गुणवत्ता फार आहे असं नाही, पण निवडून येण्याची क्षमता त्यांच्यात आहे म्हणून त्यांची दखल घेण्याची गरज.
बरं, हे अरिफमहाशय आपला पक्ष सोडून गेले कुणाकडं? तर वर्षानुवर्षं ज्या पक्षाला त्यांनी जातीयवादी, फूट पाडणारा, मनुवादी वगैरे शेलक्‍या शिव्यांनी हिणवलं होतं, त्याच पक्षाच्या दावणीला. कालपर्यंत त्यांना भाजप हिंदुत्ववादी वाटत होता, आज त्याच पक्षाचं हिंदुत्व खांद्यावर घ्यायला अरिफभाई सिद्ध झाले आहेत. म्हणजे भाजपला तत्त्वाशी देणंघेणं उरलेलंच नाही आणि अरिफभाई तर उमेदवारीसाठी उतावीळच झालेले. पक्षाचं नाव बदलून तेच होती. त्याची ती अवस्था पाहून त्याचे समर्थकही त्याच्या सुरात सूर मिसळत होते. ‘हो ना... ताईंनी यायला पाहिजे होतं. सारखं तिकडं मुंबईतच असत्यात त्या. इकडं आम्हाला काय फेस करावं लागतंय त्यांना काय माहीत.

शिंदेसाहेब तर फिरकायलाय तयार न्हाईत. आज आमची वेळ हाय नां. च्यामारी त्यांच्या टायमाला आम्ही मात्र दिवसरात्र एक करून झटलो. त्या ‘एमआयएम’ला रोखा म्हणून ताई रात्री, अपरात्री मला फोन केलत्या. अन्‌ आमच्या दादांना तिकीट द्यायची वेळ आली की कुठं गायब आहेत काही कळंना...! अशानं का कुठं कार्यकर्ते टिकतात का ओ..! तिकडं बघा, पालकमंत्री, सहकारमंत्री कार्यकर्त्यांचा फोन स्वतः उचलतात. त्यांच्याशी दोन शब्द बोलतात. भेटायला गेल्यावर भेटतात. अन्‌ आमचे हे नेते, उंटावरून शेळ्या राखताहेत...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com