'देश का चौकीदार चोर है'ने रंगल्या पंढरपुरात भिंती

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : 'गली गली मे शोर है, देश का चौकीदार चोर है' अशा घोषणा येथील नगरपालिका, रेल्वे आणि अन्य काही सरकारी मालकीच्या जागांवरील संरक्षक भिंतींवर रंगवण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता त्यांना उद्देशून या घोषणा शहरातील सरकारी मालकीच्या भिंतींवर रंगवल्या आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार आहोत असे प्रतिपादन अनेक जाहीर सभांमधून केलेले आहे. यासंदर्भात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका करून मोदींची ही नौटंकी असल्याचे म्हटले होते. काँग्रेस कडून मोदींच्या भूमिकेवर केवळ सभांमधील भाषणांमधून टीका न करता आता विविध ठिकाणी भिंतींवर घोषणा रंगवून केली जात आहे.

पंढरपूर येथे रेल्वेने टाकळी रस्त्यावरील रेल्वेच्या बोगद्यावर, पंढरपूर नगरपालिकेच्या मालकीच्या लिंगायत स्मशानभूमीच्या भिंतीवर, आमदार भारत भालके यांनी शासकीय विश्रामगृहासमोरील जलसंपदा विभागाच्या भिंतीलगत बांधलेल्या स्कूल बस थांब्यावर देखील अशाच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून विविध घोषणा लिहिण्यात आले आहेत. या घोषणांच्या खाली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे.

यासंदर्भात सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्याशी संपर्क साधला असता सकाळशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून आम्हाला अशा प्रकारच्या घोषणा ठीक ठिकाणी भिंतींवर रंगवण्यास सांगण्यात आलेले होते. शहरातील जास्तीत जास्त लोकांकडून या घोषणा वाचल्या जाव्यात या उद्देशाने आम्ही पंढरपूर शहरात 25 ते 30 ठिकाणी पक्षाकडून आलेल्या घोषणा रंगवून घेतल्या आहेत.

 पंतप्रधानांच्या विरोधातील अशा प्रकारच्या घोषणा रंगवताना नगरपालिका, रेल्वे अथवा अन्य संबंधितांकडून कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही. नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूज कर यांना विचारले असता ते म्हणाले युवक काँग्रेस कडून घोषणा रंगवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com