सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.२७ टक्के

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

यंदाही मुलींचीच सरशी; ९४.८० टक्के मुली तर, ९०.३२ टक्के मुले उत्तीर्ण

सोलापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.२७ टक्के लागला. इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या निकालामध्येही जिल्ह्यात मुलींचीच सरशी दिसून आली. जिल्ह्यात एकूण ९४.८० टक्के मुली आणि ९०.३२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीही दहावीचा जिल्ह्याचा ९२.४७ टक्के इतका निकाल लागला होता. म्हणजे निकालाची टक्केवारीत फारसी वाढ अथवा घसरण यंदा झालेली नाही.

सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ८८१ परीक्षार्थींनी दहावीची फ्रेश परीक्षा दिली होती. यामध्ये ३७ हजार २२० मुले तर, २८ हजार ६६१ मुलींचा समावेश होता. या एकूण परीक्षार्थींपैकी ६० हजार ७८९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. आणि जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.२७ टक्के इतका लागला. यामध्ये ३३ हजार ६१८ (९०.३२ टक्के) मुले आणि २७ हजार १७१ (९४.८० टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. फ्रेश परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींमध्ये जिल्ह्यातून मोहोळ तालुक्याने आघाडी घेतली आहे. मोहोळ तालुक्याचा निकाल ९४.५१ टक्के लागला आहे. उर्वरित तालुक्यांचा निकाल पुढीलप्रमाणे : माढा- ९३.६८, मंगळवेढा- ९३.४३, बार्शी- ९३.२९, सोलापूर शहर, उत्तर व दक्षिण तालुका- ९३.२२, अक्कलकोट- ९२.६८, सांगोला- ९२.४३, पंढरपूर ९१.०३, माळशिरस- ८८.७८ आणि करमाळा ८८.५० टक्के निकाल लागला आहे. दरम्यान, निकाल जाहीर होणार असल्याने परीक्षार्थी व पालकांची उत्कंठा सकाळपासून शिगेला पोहोचली होती. दुपारी ठिक एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होताच इंटरनेट आणि मोबाईलमध्ये निकाल पाहण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली. तर, दुसरीकडे उत्तीर्ण विद्याथ्र्यांनी व त्यांच्या पालकांनी पेढे व मिठाई वाटप करण्यासाठी शाळांमध्येही तितकीच गर्दी केली होती. शाळेत प्रथम तीन क्रमांक पटकाविणाऱ्या विद्याथ्र्यांसह इतर सर्व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

'रिपिटर'चा निकाल ५२.२१ टक्के
जिल्ह्याचा दहावीचा रिपिटर्सचा निकाल यंदा ५२.२१ टक्क इतका लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातून यंदा ३ हजार २७७ रिपिटर विद्याथ्र्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामध्ये २ हजार ४१४ मुले आणि ८६३ मुलींचा समावेश होता. यातील १ हजार २११ मले आणि ५०० मुली असे एकूण १ हजार ७११ रिपिटर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

२०१ शाळांचा निकाल १०० टक्के
जिल्ह्यातील तब्बल २०१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये सोलापूर शहर, उत्तर व दक्षिण तालुका- ६७, माढा- २७, बार्शी- २६, अक्कलकोट- १८, सांगोला- १५, पंढरपूर- १२, मंगळवेढा- १२, मोहोळ- ११, माळशिरस ८ आणि करमाळा तालुक्यातील ५ शाळांचा समावेश आहे.

Web Title: solapur district ssc result 92.27 percent