'जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी'

bhose
bhose

भोसे : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याच्या दक्षिण भागातील गावातील जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी या भागाला तत्काळ मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्कतेने प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यांनी आज युटोपियन कारखान्यावर या योजनेशी संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. त्यावेळी आ. प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, शिवानंद पाटील, शशिकांत चव्हाण ,राजेंद्र सुरवसे, बबलू सुतार, औदुंबर वाडेकर, चंद्रशेखर कौडूभैरी, गौरीशंकर बुरकूल, अशोक माळी, सैफन शेख आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, की युती शासनाने मंजूरी दिलेल्या योजनेच्या कामाची पुर्ती करण्याचे भाग्य देखील युती शासनाला मिळत असून आघाडी सरकारने निधी न दिल्यामुळे या भागातील जनतेचे हाल होते. पण बंद योजनाच सुरू करण्यावर केंद्र व राज्य सरकारने भर दिला.

यावेळी विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडून झालेल्या कामाची माहिती घेत चालू असलेल्या कामाची गती, कामाचा दर्जा याचा आढावा घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी रेवेवाडी, हुन्नुर, भोसे या भागातील शेतीला पाणी मिळण्यासाठी थेट पाईप पाइपद्वारे पाणी देण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना दिल्या. सांगोला वितरिकेतून तालुक्यातील तीन गावे समाविष्ठ करण्यात आल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी मंगळवेढा वितरिका क्र1 च्या पाण्यास कमी प्रेशर असल्याचे सांगून ज्यादा पाणी येण्यासाठी ओढ्यातून पाणी लवकर कसे देता येईल याची माहिती दिली. शासनाकडून येणाय्रा अडचणीवर मार्ग काढला जाईल.  अधिकाऱ्याने सदरचे पाणी डिसेंबर अखेर या भागातील दुष्काळाची दाहकता कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com