सोलापूर - मनोज पाटील नवे पोलिस अधीक्षक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

सोलापूर - गेल्या अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सुटकेचा निःश्‍वास सोडला. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची मुंबईत वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाली आहे. ठाणे येथे उपायुक्त असलेले मनोज पाटील पोलिस अधीक्षक पदावर येणार आहेत. शहरातील पोलिस उपायुक्तांच्याही बदल्या झाल आहेत. 

सोलापूर ग्रामीण पोलिस दल पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची मुंबईत वाहतूक शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त पदावर बदली झाली आहे. शहरातील पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण यांची जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे. परिमंडळ विभागाच्या पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांची औरंगाबाद येथे राज्य गुप्त वार्ता विभागात बदली झाली आहे. सोलापूर ग्रामीण सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची वर्धा येथे अप्पर पोलिस अधीक्षकपदावर बदली झाली आहे. 

ठाणे शहर येथे पोलिस उपायुक्त असलेले मनोज पाटील यांची सोलापूर पोलिस अधीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त मधुकर गायकवाड हे सोलापूर शहर पोलिस उपायुक्त म्हणून येणार आहेत. बीडचे सहायक पोलिस अधीक्षक विशाल सिंगुरी हे सोलापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेणार आहेत. मुंबई राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त एस. एच. महावरकर हे सोलापूर शहर पोलिस उपायुक्त पदावर बदली होऊन येणार आहेत.

Web Title: Solapur - Manoj Patil new Superintendent of Police