'माझ्या बायकोशी लग्न कर' असा दबाव टाकल्याने एकाची आत्महत्या

बाबासाहेब शिंदे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

तू माझ्या पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याने तू माझे पत्नीबरोबर लग्न कर असे श्रीराम जाधवर याने सांगितले.

पांगरी (ता. बार्शी) : तू माझे पत्नी सोबत फोनवर बोलत असल्याने तू माझ्या पत्नीबरोबर लग्न कर असे बोलून दबावखाली आणून एक तरुणास पती पत्नीने आत्महत्या प्रवृत्त केल्याची घटना वाणेवाडी (ता. बार्शी) येथे घडली.

प्रदीप सुनील यादव (वय 23, रा. वाणेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने कमरेला दगड बांधून विहिरीतील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना (ता. 1) रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाणेवाडी शिवारात उघडकीस आली होती. याबाबत नारायण शंकर लोखंडे यांनी पांगरी पोलीसात खबर दिल्यावरून अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. आज (ता. 9) सोमवारी श्रीराम जाधवर व त्याची पत्नी (रा. विठ्ठलनगर, बार्शी) यांनी तरूणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मयत प्रदिपचे वडील सुनिल भागवत यादव (वय 52 रा. वाणेवाडी) यांनी पांगरी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, रविवारी (ता. 1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आमचे शेजारी बार्शी येथे राहत असलेले श्रीराम जाधवर याने आपला मुलगा प्रदीप यास वाणेवाडी येथील शेतातून फोन करून बोलावून घेतले. तू माझ्या पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याने तू माझे पत्नीबरोबर लग्न कर असे श्रीराम जाधवर याने सांगितले. त्याच्या पत्नीनेदेखील तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले आहे. मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे म्हणून प्रदीप सुनील यादव यास दबावाखाली आणून त्यास आत्महत्या करणे प्रवृत्त केले आहे. याबाबत पांगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे करत आहेत.

 

Web Title: solapur marathi news husband asked one to marry wife