अद्यापही शेतकरी ऊसदराच्या आशेवरच

अद्यापही शेतकरी ऊसदराच्या आशेवरच

मंगळवेढा : राज्यात ज्वारीचे कोठार असलेल्या तालुक्यात अलीकडच्या काळात साखर उद्योगाने भरारी घेतली असून, संत दामाजी, युटोपयिन, फेबटॅक, भैरवनाथ या चार कारखान्याने मिळून गाळपाचा लाखाचा टप्पा पार केला असुन अन्य ठिकाणी व तालुक्यातही दरावरून आरोप प्रत्यारोप व आंदोलन होत असले तरी अजूनही ऊस उत्पादक शेतकरीदेखील यंदा चांगला दर देतील या आशेवरच आहे.

सध्या तालुक्यात 13 तारखेपर्यंत संत दामाजी 24125 युटोपयिन 49935, फेबटॅक 39335, भैरवनाथ 32910 इतके गाळप करीत असून गतवर्षी तालुक्यातील युटोपीयन कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाला 2611 रुपयेभैरवनाथ 2725 व फेबॅटक 2601 प्रतिटन इतका दर दिला तर दामाजीने एक रकमी 2500 दर दिल्याने शेतकऱ्यांना पैसे वापरातही आले. यंदाच्या हंगामात दर ठरला नसताना शेतकऱ्यांकडून विश्वासार्हतेवर गाळपास दिला जात आहे ऊसदारावरुन अरळी व सिध्दापूर ग्रामपंचायतीने दराबाबत ग्रामपंचायतीचे ठराव केले अरळीला सर्वप्रथम आंदोलनही झाले. तालुक्याच्या चार दिशेला कारखाने होऊन उत्पादित शेतकऱ्यांना जवळच ऊसाचे गाळप करण्याची सोय झाली. 

नदीकाठ व उजनी कालव्याचा परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे मागील हंगामात कमी पाऊस व उजनीतून पाणी न सोडल्यामुळे चार कारखान्याचा हंगाम कमी काळ चालला गाळप उसाला चांगला दर एक रकमी दिला कमी काळ कारखाना चालवल्यामुळे व्यवस्थापन खर्च व कर्मचारी पगार देताना कारखान्याला परवडले नाही. त्यामुळे कारखान्यांनी कर्मचाऱ्याला ब्रेक देवून खर्चात काटकसर करण्याचा प्रयत्न केला. हा निर्णय अनेकांना कडवट वाटला असला तरी कारखान्याच्या भवितव्यासाठी घेण्याची वेळ कारखाना व्यवस्थापनावर आली शेतकऱ्याच्या अडचणीच्यामुळे भाळवणी येथील 132 के व्ही उपकेंद्राच्या मुख्य विदयुत वाहीनीचे काम रखडल्यामुळे फॅबटेक व भैरवनाथ मधील को-जन प्रकल्पातील तयार वीजेचा पुरवठा होत नसल्यामुळे या दोन कारखान्याला को-जन मधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने जादा देणे अडचणीचे ठरत आहे पुणे येथील दराबाबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसला तरी गाळप मात्र वेगाने सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com