द्राक्षावर औषध फवारताना 7 शेतकऱ्यांना विषबाधा, बार्शीत 4 अत्यवस्थ

सुदर्शन हांडे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे कळताच माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी हॉस्पिटलला भेट देऊन शेतकऱ्यांची चौकशी केली.  हॉस्पिटल मध्ये तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी अण्णासाहेब साठे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अनिल कांबळे हे अधिक माहिती घेत आहेत.  

बार्शी : हिंगणी (ता.बार्शी) येथील शेतकरी आनंद काशीद येथील यांच्या शेतातील ऑक्टोबर छाटणी नाबतर द्राक्ष बागेत औषध लावणाऱ्या सात शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. यातील चार शेतकरी अत्यवस्थ असून एकास सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवावे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगणी येथील शेतकरी आनंद काशीद यांची १९ एकर द्राक्षबाग आहे. ऑक्टोबर छाटणी नंतर द्राक्ष कडी फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाईत हे औषध  कॅनब्रेक कंपनीचे औषध कापडाच्या साह्याने हाताने द्राक्ष काद्याना लावण्यात येत होते. काशीद यांच्या शेतात शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत औषध लावण्याचे काम चिखर्डे येथील ११ तरुण शेतकरी करत होते. दिवसभर औषध लावताना शेतकऱ्यांचे अंगावर हे औषध उतरल्याने त्वचेतून विषबाधा झाली. काम संपल्या नंतर रात्री उशिरा शेतकऱ्यांना त्रास जणवु लागल्याने बार्शीतील डॉ जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे कळताच माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी हॉस्पिटलला भेट देऊन शेतकऱ्यांची चौकशी केली.  हॉस्पिटल मध्ये तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी अण्णासाहेब साठे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अनिल कांबळे हे अधिक माहिती घेत आहेत.  

ही घटना औषधांचा जास्ती ढोस घेतल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. ढगळ वतातवरण असल्याने शेतकऱ्याच्या मागणी वरून ढोस वाढवून वापरण्यात आला होता. तर औषध फवारणीसाठी ठेकेदाराला काम देण्यात आले होते. ठेकेदाराने नवखी मूळ या कामासाठी आणल्यामुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.  नेमकी ही घटना कोणाच्या चुकीमुळे घडली याचा तपास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. 
 

या शेतकऱ्यांना झाली विषबाधा....
आनंद नानासाहेब माने (वय २२), तानाजी मोहन देठे (वय २३), किरण मधुकर मासेकर (वय : २३), दत्तात्रय तुळशीदास चव्हाण (वय २७), अक्षय हनुमंत सवणे (वय १८), सागर जनार्धन सुतार (वय २१), बाबू बापू ढवारे (वय ४०).

Web Title: solapur marathi news pesticide poisoning to seven farmers