सोलापूर बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांना दिलासा! 

Solapur Market Committee
Solapur Market Committee

सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या कारभारात 39 कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवत संबंधित तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्‍चितीसाठी कारवाई करण्यात आली. त्याविरोधात त्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी त्या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे तत्कालीन संचालकांना दिलासा मिळाला असून आता ते निवडणूक लढविणार आहेत. 

काही वर्षांपूर्वी अहवाल तयार झाला असतानाही कारवाई करण्यात आली नाही. आता बाजार समितीच्या निवडणुकीपासून याचिकाकर्ते वंचित राहावेत, या उद्देशाने कारवाई केल्याचे दिसून येते. त्यामुळे या कारवाईला स्थगिती देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांनी या संचालकांच्या अपिलावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. यामध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. वाय. एस. जहागीरदार व सारंग आराध्ये यांनी काम पाहिले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची उत्सुकता 
तत्कालीन संचालकांवर ठेवण्यात आलेल्या अनियमिततेच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली. या कारवाईच्या आदेशाची प्रत जोडून माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंड-पाटील, अशोक देवकते आणि अविनाश मार्तंडे यांनी निवडणूक लढविण्याकरिता परवानगी द्यावी, असे अपील जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे. त्याबाबत उद्या (गुरुवारी) सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. या वेळी तत्कालीन संचालकांविरोधात हरकत घेणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले निर्णय देणार असून त्याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

निवडणुकीचा निर्णय काहीही लागो परंतु, सध्याची लढाई तर न्यायदेवतेच्या जोरावर आम्ही जिंकली आहे. मंत्रिपदाचा गैरवापर करत जिल्ह्यात प्रथमच राजकीय हेतूने कारवाया सुरू झाल्या आहेत. आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना यानिमित्ताने खरे राजकारण समजले आहे. मोठमोठ्या सहकारी संस्थांची स्थिती सुधारत असताना राजकीय हेतूने कारवाया करण्यात आल्या. याचे परिणाम नक्‍की भोगावे लागतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना न्यायदेवता जागा दाखवतेच. 
- दिलीप माने, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com