सोलापूर बाजार समितीसाठी चुरशीने मतदान सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदानाला सुरुवात झालीसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील बाजार समिती असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणुक आहे. सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनलच्या विरोधात राज्याचे आरोग्य राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख निवडणुक लढवत आहेत. सहकारमंत्री देशमुख, पालकमंत्री देशमुख, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर दिग्गजांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी ३ जुलैला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: solapur market committee election