सोलापूरच्या महापौरांची सहा मार्चला निवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापौरांची निवड सहा मार्च रोजी होणार आहे. याच वेळी उपमहापौरांसह स्थायी आणि परिवहन समितीच्या सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. त्यासाठी विशेष बैठक बोलावण्याचे पत्र आयुक्तांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त किंवा त्यांनी पाठविलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होईल. यंदा महापौरपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.

महापालिकेच्या 2017-22 या पाच वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत 49 जागा मिळवून भाजपने ऐतहासिक यश मिळवले आहे. त्याखालोखाल शिवसेना 21, कॉंग्रेस 14, "एमआयएम' नऊ, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी चार आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला आणखी चार मतांची आवश्‍यकता आहे. विनाअट आणि सोलापूर विकासाचे ध्येय असलेल्या पक्षाला सोबत घेऊन काम करण्याचे धोरण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतले आहे. त्यास कोण प्रतिसाद देते हे लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: solapur mayor selection 6th march