सोलापूरच्या महापौरांचे बंडाचे निशाण

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

महापालिकेची सभा संपल्यानंतर त्या बोलत होत्या. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून देशमुख यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला आहे.
2014 मध्ये त्यांनी विक्रमी मते मिळवली होती. तिसऱ्या टर्ममध्ये त्यांनी अपेक्षित कामे न केल्याचा ठपका ठेवत पालकमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास
निवडणूक लढविण्यात येईल, असे सांगितले.

सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालकमंत्री विजय देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा पुनरूच्चार केला. देशमुख यांना सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. बनशेट्टी यांनी दोन वर्षांपूर्वी कॅाफी विथ सकाळ या उपक्रमात शहर उत्तर मधून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते.

महापालिकेची सभा संपल्यानंतर त्या बोलत होत्या. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून देशमुख यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला आहे.
2014 मध्ये त्यांनी विक्रमी मते मिळवली होती. तिसऱ्या टर्ममध्ये त्यांनी अपेक्षित कामे न केल्याचा ठपका ठेवत पालकमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास
निवडणूक लढविण्यात येईल, असे सांगितले.

या मतदारसंघातून अॅड. मिलिंद थोबडे हेही इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपचे काम करू असे महापौर म्हणाल्या. पंधरा वर्षात 
पालकमंत्र्यांनी काहीच ठोस काम केले नाही. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये. पालकमंत्र्यांना सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्यावी, आम्ही पक्षाचे काम करू. मात्र त्यांनाच उमेदवारी दिली तर, त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करू, असे बनशेट्टी यांनी सांगितले. 

त्या चर्चेची किनार
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला कात्री लावली जाण्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यासाठी पालकमंत्री पुढाकार घेत असल्याची माहित
पुढे आली आहे. बनशेट्टी या सहकारमंत्र्यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्यामागे सहकारमंत्र्यांसंदर्भातील चर्चेची पार्श्वभूमी असल्याचे मत राजकीय निरीक्षकांतून व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur mayor Shobha banshetty in rebellious against Vijay Deshmukh