सोलापूरच्या महापौरांचा 'सोनिया' पॅटर्न 

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 16 मे 2018

सोलापूर - "हिज हायनेस... मेयर ऑफ शिझिया झ्वांग सिटी...' असे देवनागरीत लिहलेले उच्चार असतील महापौर शोभा बनशेट्टी यांचे.  चीन दौऱ्यातील मुख्य कार्यक्रमासाठी त्यांनी  इंग्रजी वाक्याचे देवनागरी लिपीत उच्चार लिहून घेतले आहेत.

सोलापूर - "हिज हायनेस... मेयर ऑफ शिझिया झ्वांग सिटी...' असे देवनागरीत लिहलेले उच्चार असतील महापौर शोभा बनशेट्टी यांचे.  चीन दौऱ्यातील मुख्य कार्यक्रमासाठी त्यांनी  इंग्रजी वाक्याचे देवनागरी लिपीत उच्चार लिहून घेतले आहेत.

श्रीमती सोनिया गांधी ऱाजकारणात उतरल्यावर  सुरवातीच्या काळात अशाच पद्धतीने हिंदी भाषण इंग्रजी उच्चारात लिहून द्यावे लागत होते असे सांगितले जाते. त्याच धर्तीवर चीनमध्ये होणाऱ्या खास कार्यक्रमात महापौर जे भाषण वाचणार आहेत, ते इंग्रजी भाषण देवनागरी उच्चाराचे तयार केले आहे. सुमारे दोन ते अडीच पानांचा मजकूर असलेले हे भाषण आहे. त्यामध्ये सोलापूर शहराचा इतिहास, महापालिकेची वाटचाल, स्मार्ट सिटीमध्ये झालेला समावेश, सध्या सुरू असलेली कामे, भविष्यात होणारी कामे याबरोबरच भगिनी शहरे करार आणि त्या करारांतर्गत होणारी वाटचाल याचाही उल्लेख भाषणात करण्यात आला आहे. 

चीन सरकारच्या निमंत्रणावरून महापालिकेचे शिष्टमंडळ 17 ते 22 मे दरम्यान चीनला जात आहे. त्यासाठी आयुक्त कार्यालयाने शासकीय आणि राजकीय परवानगीसाठी नगरविकास विभागाला पत्र दिले होते. दौऱ्यात महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील आणि सहायक अभियंता संदीप कारंजे यांचा सहभाग असेल, असे पत्र सरकारकडे पाठविण्यात आले होते. मात्र फक्त महापौरांच्या नावाला सरकारने हिरवा कंदील दाखविल्याने  अधिकाऱ्यांचे चीन दौऱ्याचे स्वप्न भंगलेे. त्यामुळे महापौरांसह त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी व  इतर तिघे दौऱ्यावर गेले आहेत. बुधवारी पहाटे विमान चीनकडे रवाना झाले. महापौरांचे इंग्रजी उच्चार असलेले देवनागरीतील   भाषण हे चीनी पाहुण्यांसाठी आकर्षण असणार आहे. 

डॉ. कोटणीसांचा उल्लेख 
महापौरांच्या भाषणामध्ये "भारत व चीन' या दोन देशांतील सेतू बनलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचाही उल्लेख असेल. डॉ. कोटणीस यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तसेच सोलापूरवासीयांना चीनमध्ये मिळणाऱ्या अतिथ्य्याचाही उल्लेख महापौरांच्या भाषणात असणार आहे.

Web Title: Solapur Mayor Sonia Pattern