जिवाची घालमेल...मनधरणी...सुटकेचा निःश्‍वास.. जल्लोष 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

वायचळ यांनी राजेश काळेंना परत पाठवले 
अमोल शिंदे उमेदवारी मागे घेणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर काळे यांना इतका आनंद झाला, की शिंदे यांचा माघारीचा अर्ज ते स्वतःच घेऊन परत देण्यासाठी निघाले. त्यावेळी पीठासीन अधिकारी प्रकाश वायचळ यांनी त्यांना परत पाठवले आणि ज्यांचा अर्ज आहे, त्यांनाच परत देता येईल, असे सांगितले. ते ऐकल्यावर काळे यांनी शिंदे यांचा हात खांद्यावर टाकून घेत अर्ज परत केला. यावेळी सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. 
 

 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ८ लोक, Sangita Jadhav समाविष्टित, लोकं बसली आहेत आणि आंतरिक
सोलापूर ः महापौरपदाच्या निवडणुकीवेळी श्रीकांचना यन्नम यांच्यासाठी मतदान नोंदविताना भाजपचे नगरसेवक-नगरसेविका. 

सोलापूर ः महापौर व उपमहापौर निवडणुकीमध्ये संभाव्य फुटाफुटीची चर्चा रंगल्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची घालमेल सुरू होती. जसजसा वेळ गेला, तसतसे चित्र पालटत गेले. एकमेकांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही झाला, अखेर भाजपचे उमेदवार निवडून येण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाल्यावर भाजपच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आणि निवडीनंतर एकच जल्लोष केला. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: १२ लोक, लोकं बसली आहेत, ताल‍िका आणि आंतरिक
महापौर निवडणुकीत शहाजीदाबानो शेख यांच्यासाठी मतदान नोंदविताना एमआयएमचे नगरसेवक-नगरसेविका. 

लढतीचा अंदाज सर्वांचाच चुकला 
सकाळी 11.30 वाजता सभा सुरू झाली. पीठासीन अधिकारी प्रकाश वायचळ स्थानापन्न झाल्यावर काही मिनिटानंतर भाजपच्या नगरसेवक व नगरसेविकांचे आगमन झाले. सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते. त्यांच्यानंतर एमआयएम, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे आगमन झाले. शिवसेनेच्या नगरसेवकांचा पत्ता नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकांची घालमेल वाढली होती. प्रक्रिया सुरू झाल्यावर काही वेळाने विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात आले. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ६ लोक, लोकं बसली आहेत आणि आंतरिक
उपमहापौर निवडणुकीत फिरदोस पटेल यांच्यासाठी मतदान नोंदविताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक. 

सुरवातीला महापौरपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी माघार घेतली. आता एमआयएमच्या शहाजीदाबानो शेख या माघार घेतली आणि श्रीकांचना यन्नम व शिवसेनेच्या सारिका पिसे यांच्यात लढत होईल, असा अंदाज व्यक्त होत असतानाच सर्वांना धक्का बसला. पिसे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे एमआयएमने तटस्थ राहण्याच्या भूमिकेत बदल केला आणि शहाजीदाबानो शेख यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले, मात्र यश आले नाही. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: १३ लोक, Raja Mane समाविष्टित, लोक हसत अाहेत, लोकं उभी आहेत
नूतन महापौरांचे अभिनंदन करताना श्रीदेवी फुलारे 

आणि उपमहापौरपदाचे उमेदवार काळे यांनी केले हुश्‍श... 
महापौर निवडीच्या वेळी जेवढी धाकधूक होती, त्यापेक्षा तिप्पट-चौपट धाकधूक उपमहापौर निवडणुकीच्या वेळी होती. या पदासाठी नऊ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी शहाजीदाबानो शेख, किसन जाधव, नरसिंग कोळी व भारतसिंग बडुरवाले यांनी माघार घेतली. भाजपचे नागेश वल्याळ यांनी माघार घेतली नव्हती. ते सभागृहाबाहेर गेले. त्यावेळी माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांची समजूत घातली, इतर नगरसेवकांनीही वल्याळ यांना विनंती केली. त्यावेळी वल्याळ यांनी माघार घेतली. वल्याळ रिंगणात असते तर या निवडणुकीत मोठी रंगत आली असती, मात्र त्यांनी माघार घेतल्याने अमोल शिंदे यांनीही माघार घेतली. त्यामुळे राजेश काळे यांच्या जिवात जीव आला. उपमहापौरपदासाठी काळे, फिरदोस पटेल व तस्लिम शेख यांच्यात लढत झाली. तीत काळे यांना 50, तर पटेल यांना 34 आणि शेख यांना आठ मते मिळाली. या निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी, माकप तटस्थ राहिले. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ११ लोक, Rajesh Kale, Avinash Konda आणि Anand Chandanshive समाविष्टित, लोक हसत अाहेत, लोकं उभी आहेत आणि आंतरिक
नूतन महापौर, उपमहापौरांचे अभिनंदन करताना चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, विनोद भोसले व इतर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur mayour election happnings