सोलापूर महापालिकेवर 372 कोटींचे दायित्व 

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : महापालिकेवर सुमारे 372 कोटी 92 लाख रुपयांचे दायित्व आहे. तसेच दरमहा 24 कोटी 43 लाख रुपयांची गरज असल्याचा अभिप्राय मुख्य लेखापालांनी आयुक्तांकडे सादर केला आहे. 

दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान आणि अग्रीम द्यावे या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली व सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांना दिले. त्यानुसार श्री. धनवे यांनी सायंकाळी आपला अहवाल उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे सादर केला. 

महापालिकेस जीएसटी अनुदानापोटी दरमहा 18 कोटी 60 लाख रुपये मंजूर होतात. मात्र एप्रिल 2018 पासून ही रक्कम 15 कोटी 34 लाख इतकी झाली आहे. त्यामुळे दरमहा 3.26 कोटी रुपयांचे कमी अनुदान मिळत आहे. महापालिका विविध विभागाकडून सप्टेंबरअखेर 74 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय दैनंदिन अत्यावश्‍यक खर्चासाठी दरमहा 24 कोटी 43 लाख रुपये लागतात. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन (11.50 कोटी), सेवानिवृत्तीवेतन (3.93 कोटी), वीजेचे बिल (4 कोटी), पाण्याचे बिल (25 लाख), शिक्षण मंडळ खर्च (1.4 कोटी), परिवनला मदत (56 लाख), डिझेल (25 लाख), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (25 लाख), पाणीपुरवठा व अत्यावश्‍यक सेवा (1.25 कोटी), इतर अत्यावश्‍यक खर्च (50 लाख) आणि नगरसेवकांचे मानधन व कंत्राटी सेवकांवरील खर्च (90 लाख). 

महापालिकेवर असलेले 372 कोटींचे दायित्व 
घटक रक्कम रुपयांत 

कर्मचाऱ्यांची देणी 118.42 कोटी 
शिक्षण मंडळ देणी 2.00 कोटी 
भूंसंपादन व इतर 8.00 कोटी 
शासन योजनेस हिस्सा 37.00 कोटी 
स्मार्ट सिटी हिस्सा 80 कोटी 
शासकीय कर्जे 26.50 कोटी 
मक्तेदारांची देय रक्कम 101.00 कोटी 
एकूण 372.92 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com