सोलापूर महापालिकेने केली "नोटीस-वॉरंट फी माफी'ची परंपरा खंडीत 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सोलापूर : थकबाकीदार मिळकतदारांना दिली जाणारी "नोटीस-वॉरंट फी' माफीची परंपरा खंडीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदार मिळकतदारांना दंडासह रक्कम भरावी लागणार आहे. 

सोलापूर : थकबाकीदार मिळकतदारांना दिली जाणारी "नोटीस-वॉरंट फी' माफीची परंपरा खंडीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदार मिळकतदारांना दंडासह रक्कम भरावी लागणार आहे. 

शहर व हद्दवाढ मिळून सुमारे अडीच लाख मिळकती आहेत. सर्वसाधारणपणे जूनमध्ये मिळकतकराची बिले वाटण्यात येतात. त्यानंतर विशिष्ट मुदतीत ही बिले भरल्यास पाच टक्के सवलत मनपाकडून दिली जाते. मिळकतकराचा भरणा जास्तीत जास्त होण्यासाठी मनपाकडून 5 टक्के सवलतीच्या योजनेला मुदतवाढ दिली जाते. यंदा मात्र अशी सवलत जुलैअखेरपर्यंत होती. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली नाही. मुदतीनंतर बिल भरण्यास येणाऱ्यांना पाच टक्के सवलत देणे काटेकोरपणे बंद करण्यात आले. अशांना दरमहा दोन टक्के शास्तीही आकारली जात आहे. थकीत मिळकतकराबाबतची नोटीस-वॉरंट फी तसेच शास्ती अजिबात माफ न करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. माफी दिल्यास प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या मिळकतदारांवर अन्याय केल्यासारखे होईल, अशी आयुक्तांनी भूमिका आहे. 

कर भरण्याची ऑनलाईन सुविधा झाल्याने मिळकतकराची घरोघरी जाऊन वसुली करण्याची पद्धत काही महिन्यांपासून बंद झाली आहे. महापालिका किंवा मनपाने विशिष्ठ बॅंकांच्या मदतीने उभारलेल्या ऑनलाईन केंद्रांवरच हा कर घेतला जात आहे. संगणकीकरण-ऑनलाईनमुळे आतापर्यंत कोणत्या मिळकतदारांनी बिले भरली व कोणत्या मिळकतदारांनी बिले भरली नाही, याची माहिती मनपा कर आकारणी व कर संकलन विभागाकडे उपलब्ध नाही. संगणक विभागाकडून माहिती घेतल्यानंतर कर संकलन विभागाला थकीत मिळकतदारांचा तपशील समजणार आहे. हा तपशील मिळाल्यावरच नोटिसा बजाविणे व पुढील कारवाई करता येणार आहे. 

Web Title: solapur municipal corporation breaks tradition of notice warranty fee exemption