स्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात 

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या महापालिका सभेत सदस्य निवडीसंदर्भात विषय येऊ शकतो. त्यामुळे समितीत जाऊ इच्छिणाऱ्यांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. 

महापालिका स्थायी समिती सभापती पदाचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. गेल्या वर्षभरात समितीची एकही सभा झाली नाही. त्यामुळे या समितीत पहिल्यांदाच आलेल्या सदस्यांना समितीच्या कामकाजात सहभागी होता आले नाही. पहिल्यावेळी 16 पैकी आठ सदस्यांची चिठ्ठी निघाली. त्यापैकी नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, मनीषा हुच्चे, राजेश्री बिराजदार (भाजप), प्रवीण निकाळजे व नरसिंग कोळी (कॉंग्रेस) आणि विठ्ठल कोटा (शिवसेना) या सदस्यांची मुदत यंदा संपत आहे. बसपचे आनंद चंदनशिवे यांची चिठ्ठी निघाली, पण त्यांनाच पुन्हा संधी मिळाल्याने त्यांना आणखी एक वर्ष समितीत राहता येणार आहे. उर्वरित सात जणांच्या ठिकाणी नव्याने सदस्य नियुक्त करावे लागणार आहेत. 

स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने गेल्या वर्षभरात महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयाचे सर्व प्रस्ताव आयुक्तांमार्फत थेट सर्वसाधारण सभेकडे आले. त्यामुळे सुरवातीच्या कालावधीत अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिले. त्याबाबत काही प्रमाणात टीका सुरू झाल्यावर सर्व प्रलंबित विषय मंजूर करून घेऊन महापौर शोभा बनशेट्टी यांनी एक प्रकारे विक्रमच केला आहे. स्थायी समिती सभापतीचा वाद न्यायप्रविष्ठ राहिला तरी सदस्य निवडीची प्रक्रिया नगरसचिव कार्यालयाकडून सुरू होणे अपेक्षित आहे. 

निकालाबाबत उत्सुकता 
स्थायी समिती सभापतीच्या याचिकेवर 18 किंवा 19 जानेवारी रोजी निकाल अपेक्षित आहे. काय निकाल लागतो यावर महापालिकेतील राजकारणाची पुढील गणिते ठरण्याची शक्‍यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्षाकडून संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com