सोलापूर- काँग्रेसच्या नगरसेवकाचे भवितव्य भाजपश्रेष्ठींच्या हाती 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सोलापूर : काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव घ्यायचा की नाही हे भाजप श्रेष्ठींशी चर्चा करून ठरविले जाणार आहे. त्यामुळे श्री. निकाळजे यांचे भवितव्य भाजप श्रेष्ठींच्या धोरणावर अवलंबून आहे. आयुक्तांनी हा प्रस्ताव एप्रिलच्या विषयपत्रिकेवर घेण्याची शिफारस केली आहे. मात्र सभेच्या मूळ विषयपत्रिकेवर हा विषय घेण्यात आलेला नाही. 20 एप्रिलला सभा होणार आहे. याच सभेत पालिकेच्या विशेष समित्यांच्या सदस्यांची निवडही होणार आहे. शोभा बनशेट्टी यांनी महापालिकची सर्वसाधारण सभा 20 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता घेण्याचे पत्र नगरसचिवांना दिले आहे.

सोलापूर : काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव घ्यायचा की नाही हे भाजप श्रेष्ठींशी चर्चा करून ठरविले जाणार आहे. त्यामुळे श्री. निकाळजे यांचे भवितव्य भाजप श्रेष्ठींच्या धोरणावर अवलंबून आहे. आयुक्तांनी हा प्रस्ताव एप्रिलच्या विषयपत्रिकेवर घेण्याची शिफारस केली आहे. मात्र सभेच्या मूळ विषयपत्रिकेवर हा विषय घेण्यात आलेला नाही. 20 एप्रिलला सभा होणार आहे. याच सभेत पालिकेच्या विशेष समित्यांच्या सदस्यांची निवडही होणार आहे. शोभा बनशेट्टी यांनी महापालिकची सर्वसाधारण सभा 20 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता घेण्याचे पत्र नगरसचिवांना दिले आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने प्रशासनाकडून येणारे शेकडो विषय थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत.

अवैध बांधकाम प्रकरणी श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार सुनावणी झाल्यावर मागणीत तथ्य आढळल्याने हा विषय वरिष्ठ स्तर न्यायाधीशाकडे पाठविण्याची शिफारस आयुक्तांनी सभेकडे केली आहे. मात्र हा विषय अजेंड्यावर कधी घ्यायचा याचा निर्णय भाजपश्रेष्ठींशी चर्चा करून घेतला जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सभेच्या मूळ विषयपत्रिकेवर हा विषय असणार नाही, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. महिला बालकल्याण समितीसह नऊ समित्यांच्या सदस्यांची निवड या सभेत होणार आहे. शहर सुधारणा, स्थापत्य, विधी, मंड्या व उद्यान या समितीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. विशेषतः महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी इच्छुक असलेल्यांकडून आतापासूनच फिल्डींग लावली जात आहे.

Web Title: solapur municipal corporation corporator case