उचल रक्कम समायोजनेला आली 'सशा'ची गती 

Solapur
Solapur

सोलापूर : विविध कामांसाठी घेतलेल्या उचल रकमेचा हिशेब देण्याच्या कामाला आता "सशाचा' वेग आला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही हिशेब देण्यास टंगळ-मंगळ करण्यात येत होती. या संदर्भात "सकाळ'मध्ये "समायोजन "कासवगतीने' ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर दोन दिवसांत तब्बल आठ कोटींचा हिशेब क्‍लिअर झाले आहे. काल सुटी असतानाही समायोजनाचे काम सुरू होते. 

हिशेब नाही दिला तर उचललेली हजारो रुपयांची रक्कम एकदम भरण्याची वेळ येऊ शकते याची जाणीव झाल्याने  सुटीच्या दिवशीही समायोजनासाठी गर्दी झाली होती.  कालअखेर आठ कोटींचे समायोजन झाले होते. त्यामुळे आता 108 कोटींचा हिशेब राहिला आहे. आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलेखापाल यू. पी. काकडे, रवींद्र कंदलगी, सुहास गायकवाड व विश्‍वास क्षीरसागर हे समायोजनाची कार्यवाही करत आहेत. 

रक्कम समायोजन केलेले काही महत्त्वाची  खाती ः नगरअभियंता (तीन कोटी 43 लाख 93 हजार 001), आरोग्याधिकारी (नऊ लाख आठ हजार 78), सामान्य प्रशासन विभाग (22 लाख 46 हजार 522), सार्वजनिक आरोग्य अभियंता (तीन लाख 17 हजार), विभागीय अधिकारी (12 लाख 51 हजार 501), कर संकलन (76 हजार), निवडणूक कार्यालय (67 हजार 800), भूमी व मालमत्ता (57 हजार), कॅम्प प्रशाला (50 हजार). 

नगर रचनाचा सहा कोटींचा हिशेब तयार 
भूसंपादनासाठी नगर रचना विभागाने सुमारे सहा कोटी रुपयांची उचल घेतली होती. त्यापैकी सुमारे पाच कोटी 93 लाख रुपयांपर्यंतचा हिशेब क्‍लिअर झाला आहे. मात्र तो अद्याप मुख्य लेखापाल कार्यालयात सादर झाला नाही. आयुक्तांच्या मान्यतेनंतर हा हिशेब सादर केला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com