सोलापूर हद्दवाढच्या विकासासाठी राज्य शासनाचा बोनस 

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 28 मार्च 2018

या निधीतून ही होतील कामे 
- पाणीपुरवठा, ड्रेनेज, पर्जन्य जलवाहिन्या 
- आराखड्यातील आरक्षणे विकसित करणे 
- ग्रंथालय, वाचनालय, प्रेक्षागृह, नाट्यगृह 
- प्रमुख नागरी मार्ग, वाहनतळ, व्यापारी संकुल 
- मनपाचे विभागीय कार्यालये उभारणे 
- उद्यान व हरित पट्टे विकसित करणे 

सोलापूर : शहराच्या हद्दवाढ विभागाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या योजनेंतर्गत 17 कोटी 40 लाख 60 हजार 189 रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी शासनाचा 80 टक्के हिस्सा म्हणून 13 कोटी 92 लाख रुपये मिळणार असून, 20 टक्के हिस्सा म्हणून तीन कोटी 48 लाख रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. 

राज्यातील महापालिकांच्या हद्दवाढ विकासासाठी शासनाकडून विशेष निधी देण्यात येतो. त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या हद्दवाढ विभागातील विकासासाठी "अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर' निधी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनांतर्गत हा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाचा हिस्सा मिळण्यासाठी महापालिकेने 20 टक्के रक्कम भरण्याची तयारी असल्याचा ठराव मंजूर करणे आवश्‍यक आहे. 

या योजनेंतर्गत होणारी सर्व कामे ई-निविदा पद्धतीनेच होणे बंधनकारक आहे. या सूचनेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास ती गंभीर अनियमितता समजली जाणार असून, त्यास जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. या निधीतून इतर कामे होत नाहीत ना याची खात्री करण्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. योजनेंतर्गत होणारी कामे ही सार्वजनिक मालकीच्या जागेतच होतील याचीही दक्षता घेतली जाणार आहे. 

या निधीतून ही होतील कामे 
- पाणीपुरवठा, ड्रेनेज, पर्जन्य जलवाहिन्या 
- आराखड्यातील आरक्षणे विकसित करणे 
- ग्रंथालय, वाचनालय, प्रेक्षागृह, नाट्यगृह 
- प्रमुख नागरी मार्ग, वाहनतळ, व्यापारी संकुल 
- मनपाचे विभागीय कार्यालये उभारणे 
- उद्यान व हरित पट्टे विकसित करणे 

Web Title: Solapur municipal corporation fund