सहा वर्षांत मिळाले सोलापूर महापालिकेस 1170 कोटी

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 31 मार्च 2018

आकडे बोलतात...
कालावधी : 06 वर्षे
शासन अनुदान : 1170.25 कोटी
खर्ची पडले : 921.34 कोटी
जिल्हा अनुदान : 82.70 लाख
खर्ची पडले : 75.38 लाख

सोलापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून गेल्या सहा वर्षांत (2012-2017) तब्बल 1170 कोटी 25 लाख 21 हजार 029 रुपये महापालिकेस
मिळाले. त्यापैकी 921 कोटी 34 लाख 52 हजार 453 रुपये खर्ची पडले आहेत. 

एलबीटी, मुद्रांक शुल्क, रस्ता अनुदान, अल्पसंख्याक बहुलक्षेत्र विकास, रमाई आवास, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (रस्ते, मलनिस्सारण), विेशेष योजना, 
वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान, महापालिका क्षेत्रात विशेष सुविधा देण्यासाठीचे अनुदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना, 13 वे वित्त आयोग, घर तेथ स्वच्छतागृह, आधार, राजीव आवास योजना, अल्ली महाराज सांस्कृतिक भवन, अग्निशमन सेवेचे बळकटीकरण, पथदिव्यांमध्ये उर्जासंवर्धन, जमीन महसूल अनुदान, करमणूक कर अनुदान, संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान, व्यवसाय कर अनुदान, बस खरेदी अनुदान, मत्स्य बाजारपेठ उभारणी अनुदान, चॅलेंज फंड, एलबीटी-जीएसटी अनुदान, 14 वे वित्त आयोग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, स्मार्ट सिटी, अमृत योजना (पाणीपुरवठा, सौरउर्जा व हरितपट्टा) या योजनांसाठी हे अनुदान मिळाले होते. त्यापैकी विविध योजना कार्यरत झाल्या असून, काही प्रगतीपथावर आहेत. 

जिल्हा नियोजन समितीकडून या कालावधीत 82 कोटी 70 लाख 77 हजार 805 रुपयांचे अनुदान मिळाले. त्यापैकी 75 कोटी 38 लाख 75 हजार 030 रुपये खर्च झाले आहेत. हे अनुदान महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तर (रस्ते, ड्रेनेज व पाणीपुरवठा), वडगबाळ ते व्हनमुर्गी जलवाहिनी, महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान, आमदार व खासदार निधी, नागरी दलित अनुदान, अंगणवाडी केंद्र इमारतीचे बांधकाम, टंचाई कामांतर्गत तातडीचे पाणीपुरवठा योजनांतर्गत अनुदान, पुरातन वास्तू संवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पाणीपुरवठा योजना, सीसीटीव्ही बसविण्यासाठी अनुदान, स्कॅनर खरेदीसाठी अनुदान आणि जलतरण स्प्रिंग बोर्ड खरेदीसाठी अनुदान या योजनांसाठी मिळाले आहे. 

आकडे बोलतात...
कालावधी : 06 वर्षे
शासन अनुदान : 1170.25 कोटी
खर्ची पडले : 921.34 कोटी
जिल्हा अनुदान : 82.70 लाख
खर्ची पडले : 75.38 लाख

Web Title: Solapur Municipal Corporation fund