सोलापूर महापालिकेचे दरमहा 14 कोटींचे नुकसान 

विजयकुमार सोनवणे 
मंगळवार, 10 जुलै 2018

संपलेल्यांना 81 सी च्या नोटीसा 
संपलेल्या सर्व गाळेधारकांना 81 सी च्या नोटीसा देण्यात येणार आहेत. त्यानुसार गाळे रिकामे करण्यासाठी त्यांना मुदत दिली जाणार आहे. मुदतीत गाळे रिकामे न केल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर : महापालिकेच्या विविध गाळ्यांसाठी असलेल्या अत्यल्प भाड्यामुळे महापालिकेस दरमहा 14 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेडीरेकनरनुसार पालिकेने गाळ्यांचे दर निश्‍चित केले असून, त्यानुसार हे उत्पन्न मिळू शकते. 

महापालिकेच्या 19 ठिकाणच्या गाळ्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यानुसार तेथील सध्याचा दर आणि रेडीरेकननुसार होणारा दर याची तफावत काढण्यात आली आहे. ही तफावत भरून काढली तर पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने या सर्व गाळ्यांची यादी, सध्याचे भाडे, प्रस्तावित भाडे व रेडीरेकनरनुसार घ्यावयाचे भाडे याचा तक्ता केला आहे. त्यावर सभागृहात चर्चा होणार आहे. 

सिकची धर्मशाळेमुळेही नुकसान 
भवानीराम सिकची धर्मशाळेतील भाड्याने दिलेल्या खोल्यामुळेही पालिकेला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. या ठिकाणी अत्यल्प भाडे असून, जवळपास सर्वच गाळेधारकांची मुदत संपली आहे. त्यामुळे हे गाळे ताब्यात घेऊन, लिलाव केल्यास कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळणार आहे. 

संपलेल्यांना 81 सी च्या नोटीसा 
संपलेल्या सर्व गाळेधारकांना 81 सी च्या नोटीसा देण्यात येणार आहेत. त्यानुसार गाळे रिकामे करण्यासाठी त्यांना मुदत दिली जाणार आहे. मुदतीत गाळे रिकामे न केल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Solapur Municipal Corporation money waste