प्रथा नव्हे कायदाच श्रेष्ठ; महापालिका प्रशासनाची बनवेगिरी उघड

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 4 मे 2018

सोलापूर : महापालिकेचे कामकाज हे प्रथेनुसार नव्हे तर कायद्यानेच चालवावे लागते यावर आज झालेल्या महापालिकेच्या सभेत स्पष्ट झाले. प्रथेचे कारण देत लोकनियुक्त नगरसेवकांची दिशाभूल करणार्या प्रशासनाची बनवेगिरी यामुळे उघड झाली. प्रथेचा स्तोम माजविणाऱ्या नगरसचिवांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यानेच, कायद्यातील तरतुदीचा आधार घेत हंगामी सभापती निवडण्याचा अधिकार सभेला असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. 

सोलापूर महापालिकेच्या सभेत प्रथेचा स्तोम माजविला असल्याच्या विरोधात सकाळने वारंवार आवाज उठविला होता.

स्थायी समितीला डावलून थेट सर्वसाधारण सभेकडे कोट्यवधी रुपयांच्या कामाचे विषय प्रशासनाने पाठविले होते. त्यावर विरोधी पक्षनेता महेश कोठे यांनी नगरसचिवांवार प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचा प्रत्येक प्रश्न हा प्रशासनाने आतापर्यंत केलेली दिशाभूल उघडी करणारा असल्याने, त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नगरसचिवांना महापौरांच्या माध्यमातून प्रमुखांकडे पहावे लागल्याचे दृश्य सभागृहात दिसून आले. त्यामुळे कायद्यासंदर्भातील त्यांचे अज्ञान दिसून आले.

अधिनियमातील तरतुदीनुसार हंगामी सभापती निवडण्याचे पत्र राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नगरसेवक किसन जाधव यांनी आयुक्तांना दिले होते. त्याला दीड महिना उलटून गेला. 
त्याचे उत्तर अद्याप दिले गेले नाही. त्याचा संदर्भ घेत आणि अधिनियमातील तरतुदींचा उल्लेख करीत श्री. कोठे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कायद्यातील तरतुदींचा श्री. कोठे, श्री. जाधव, नागेश वल्याळ व राजकुमार हंचाटे या नगरसेवकांनी किस पाडल्यानंतर, आता आपण नगरसेवकांना बनवू शकत नाही हे प्रशासनाच्या ध्यानात आले आणि स्थायी समितीची विशेष सभा बोलावण्याचा अधिकार हा सर्वसाधारण सभेचा आहे. काय करायचे ते तु्म्हीच ठरवा, असे उत्तर देण्यात आले आणि त्याचवेळी प्रशासनाने आतापर्यंत केलेली दिशाभूल स्पष्ट झाली.

वास्तविक पहाता श्री. जाधव आणि समितीच्या बारा सदस्यांनी सभा बोलावण्याचे पत्र दिल्यावर, विशेष सभा बोलावण्याचा अधिकार सभेचा आहे असे उत्तर देता आले असते. 

पण स्वतःचे महत्त्व आणि न्यायालयाच्या निर्णयाचे निमित्त सांगून दीड महिन्यांपासून वेळ मारून नेली. मनमानी कारभार फार दिवस चालत नाही हे आज स्पष्ट झाले आणि
अभ्यासू नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांनी अधिकार्यांची भंबेरी उडाली आणि प्रथेपेक्षा कायदाच श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट झाले. 

प्रथेनुसार नको कायद्याने बोला
स्थायी समितीच्या तरतुदीबाबत यावेळी काहीही विचारले की, प्रथेनुसार सुरु असल्याचे मोघम उत्तर नगरसचिवांकडून दिेले जायचे. आज या संदर्भात श्री. कोठे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर, नगरसचिव उत्तर द्यायला उभारले. त्यावेळी, प्रथेनुसार नको कायद्यानुसार चालणार्या कामकाजाची माहिती द्या, अशी सूचना एमआयएमचे
नगरसेवक रियाज खरादी यांनी केली. त्यावेळी नगरसचिव आणि प्रशासन प्रमुखांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते.

Web Title: Solapur Municipal Corporation must follow the law