सोलापुरात अभय योजनेला पाणीचोरांचा 'ठेंगा' 

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : अनधिकृत नळाद्वारे पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. मात्र, त्यास संबंधितांकडून "ठेंगा'दाखविण्यात आल्याने, पुन्हा एकदा लवकरच अनधिकृत नळजोड शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 

तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार 10 हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळजोड नियमित करून घ्या, असे स्वरूप असलेली ही योजना जाहीर करण्यात आली. सोलापूर शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत नळजोड असल्याचा आरोप वारंवार केला जातो. त्यात तथ्यही असल्याचे अनेकदा आढळले आहे. तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी अशा पाणीचोरांविरुद्ध मोहीम राबविली. त्यांनी पहिला हातोडा उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरणाऱ्यांवर हाणला. धक्कादायक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात मान्यवर म्हणून वावरणारे मोहोळ परिसरातील अनेक प्रतिष्ठित पाणीचोर निघाले होते. याप्रकरणी काहीजणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, नंतर हा विषय तिथेच थांबला. 

जलवाहिनीवरील मोहीम संपल्यानंतर श्री. काळम-पाटील यांनी शहरातील पाणीचोरांविरुद्ध मोहीम राबविली. 21 ते 30 ऑगस्ट 2015 या कालावधीत आठ विभागीय कार्यालयांतर्गत राबविलेल्या या मोहिमेत 465 पाणीचोर आढळले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. ही बाब अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी सर्वेक्षण केल्यानंतर शहराच्या अनेक भागांत अजूनही अनधिकृत नळजोड असल्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर हे नळजोड नियमित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. नळजोड नियमित करण्यासाठी रीतसर अर्ज, अनामत, मीटर चार्ज व कोटेशन मिळून 10 हजार रुपये दंड आणि नळजोड घेतलेल्या दिवसांपासूनची पाणीपट्टी भरून नळजोड नियमित करता येतील. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. 

महापालिकेच्या ठरावानुसार "अभय' योजना जाहीर करण्यात आली. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत नळजोड शोधण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. 
- देविदास मादगुंडी, अभियंता, महापालिका पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com