मिळकतींच्या अचूक नोंदीसाठी सोलापूर महापालिकेचे 'जिओ टॅग'

मिळकतींच्या अचूक नोंदीसाठी सोलापूर महापालिकेचे 'जिओ टॅग'

सोलापूर- मिळकतीची अचूक माहिती मिळण्यासाठी महापालिकेने 'जिओ टॅग' ही यंत्रणा उभारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे जागांचा व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक टळणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्व मिळकतींची नोंद या यंत्रणेच्या माध्यमातून केली जात आहे. 

महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावरून ही यंत्रणा हाताळता येणार आहे. महापालिकेच्या सर्व मालमत्तांची नोंदणी या माध्यमातून करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. त्यानुसार सर्व मालमत्तांची नोंदणी केली जात आहे. महापालिकेच्या सर्व मालमत्तांचे रेकॉर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी गाळ्याची तपासणी तसेच जागांची पाहणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा, शाळा, दवाखाने, प्रसूतिगृहे, मंडई, बागा, समाजमंदिर, वाचनालय, अभ्यासिका, जकात नाके, पाण्याच्या टाक्‍या, अग्निशमन केंद्र, कर्मचारी वसाहती, व्यापारी संकुल, मैदाने, स्मशानभूमी, जलशुद्धीकरण केंद्र, मासळी बाजार, प्रभाग कार्यालये, स्मारके, पुतळे, पुतळ्यांचा परिसर या सर्वांची माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून नोंद केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीची कोणतीही मालमत्ता क्षणात पाहता येणार आहे. 

फसवणूक टळणार 
अनेकदा मिळकत क्रमांकांच्या ठिकाणी प्रत्यक्षातील जागा नसते. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. मिळकतीच्या नकाशात आसपास काय आहे याचीही माहिती नसते. जागा घेतल्यानंतर एक-एक अडचणी समोर येऊ लागतात. जागा घेण्यापूर्वी या यंत्रणेचा वापर केल्यास जागा नेमकी कुठे आहे, जागेच्या आजूबाजूला रस्ता आहे की अतिक्रमण याचीही माहिती मिळणे शक्‍य होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com