सोलापूरच्या पोटनिवडणुकीत नऊ उमेदवारांचे "पावणेनऊ लाख' खर्च 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 8 मे 2018

सोलापूर - महापालिका प्रभाग 14 "क'च्या पोटनिवडणुकीत नऊ उमेदवारांनी आठ लाख 72 हजार 326 रुपये खर्च केले आहेत. सर्वाधिक खर्च कॉंग्रेसच्या तौफिक हत्तुरे यांनी केला. त्याखालोखाल भाजपचे रणजितसिंह दवेवाले आणि एमआयएमच्या पीरअहमद शेख यांचा क्रमांक आहे. 

सोलापूर - महापालिका प्रभाग 14 "क'च्या पोटनिवडणुकीत नऊ उमेदवारांनी आठ लाख 72 हजार 326 रुपये खर्च केले आहेत. सर्वाधिक खर्च कॉंग्रेसच्या तौफिक हत्तुरे यांनी केला. त्याखालोखाल भाजपचे रणजितसिंह दवेवाले आणि एमआयएमच्या पीरअहमद शेख यांचा क्रमांक आहे. 

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 30 दिवसांच्या आत विजयी आणि पराभूत उमेदवारांनी खर्च सादर करणे आवश्‍यक आहे. अन्यथा विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते आणि पराभूतांना निवडणूक लढविण्यास बंदी येऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर सर्वच उमेदवारांनी निकालानंतर 10 ते 15 दिवसांत आपला खर्च सादर केला आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल पावणेदोनशे उमेदवारांनी खर्च दिला नव्हता, तो सादर करण्यासाठी आयोगाने मुदत दिली, त्यानंतरही तब्बल 60 उमेदवारांनी खर्च दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर सहा महिन्यांची निवडणूक बंदी आली आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा सात लाख रुपयांची आहे. मात्र, एकाही उमेदवाराचा खर्च अडीच लाखांपेक्षा जास्त झालेला नाही. श्री. हत्तुरे यांनी सर्वाधिक दोन लाख 13 हजार 40 रुपये खर्च दाखविला आहे, तर सर्वांत कमी हिंदुस्थान जनता पार्टीचे उमेदवार गौस कुरेशी यांनी 28 हजार 174 रुपये इतका दाखविला आहे. उमेदवारांनी आपला खर्च सादर केला असला, तरी त्यांच्या पोटनिवडणुकीत उमेदवारासाठी काही खर्च केला असेल तर पक्षांनीही खर्च देणे बंधनकारक आहे. 

उमेदवार पक्ष खर्च रुपयांत 
तौफिक हत्तुरे कॉंग्रेस 2,13,040 
रणजितसिंह दवेवाले भाजप 1,63,464 
पीरअहमद शेख एमआयएम 1,14,584 
नलिनी कलबुर्गी माकप 1,06,534 
बापू ढगे शिवसेना 95,437 
सद्दाम शाब्दी राष्ट्रवादी 65,470 
वसीम सालार अपक्ष 52,280 
अ.क. सिद्दकी अपक्ष 33,343 
गौस कुरेशी हिं.जे.पी. 28,174

Web Title: solapur municipal by election candidate expenditure