सोलापूर महापालिका प्रसूतीगृहांचे पालटतंय 'रुपडं'; सोनोग्राफीची मोफत सोय 

Solapur Municipal Hospital has facilities for Maternity home
Solapur Municipal Hospital has facilities for Maternity home

सोलापूर - महापालिकेची दवाखाने आणि प्रसूतिगृहांनी 'कात' टाकली असून, प्रसूती आणि शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. सोनोग्राफीची मोफत सोय असल्याने सर्वच स्तरांतील महिलांची गर्दी होत आहे. एकूणच, अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या प्रसूतिगृहांचे गेल्या काही महिन्यांपासून 'रुपडं' बदलले आहे. 

महापालिकेची दवाखाने सुधारण्याचा संकल्प आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केला आहे. त्यानुसार दवाखाने व प्रसूतिगृहे सुधारण्यासाठी आवश्‍यक सुविधा केल्या आहेत. त्याअंतर्गत दाराशा, डफरीन आणि बॉईस या प्रसूतिगृहांमध्ये सोनोग्राफी यंत्रे बसविण्यात आली आहेत. ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याने रुग्णांची मोठी गर्दी या तीन केंद्रांवर होत आहे. दाराशा आणि डफरीन हॉस्पिटलमध्ये महापालिकेने, तर बॉईस प्रसूतिगृहात डॉ. सतीश वळसंगकर यांनी दिलेले सोनोग्राफी यंत्र बसविण्यात आले आहे. इतर आजारांवरील उपचारांचीही चांगली सुविधा झाल्याने रुग्णांचीही संख्या वाढली आहे. 

सुरवातीला महापालिकेच्या प्रसूतिगृहांत तपासणी करण्यासाठी जायचे म्हटल्यावर रुग्णांसह नेणाऱ्याच्या चेहऱ्यांवर नाराजी दिसत असे. सुविधा नसल्यामुळे नागरिक प्रत्येक तपासणी व औषधोपचारांसाठी खासगी दवाखान्यांची पायरी चढत. त्याच वेळी त्यांच्या खिशालाही कात्री लागत असे. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही प्रसूतिगृहे सुधारली आहेत. त्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढली आहे.

 सोनोग्राफीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. गरज असेल तरच सोनोग्राफीची सूचना केली जाते. दाराशा हॉस्पिटलमध्ये डॉ. शोभा शहा, डफरीन हॉस्पिटलमध्ये डॉ. मीनल चिडगुपकर आणि बॉईस मॅटर्निटीमध्ये लता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रुग्णांना मिळणारा प्रतिसाद पाहता गरीब रुग्णांची पावले आपोआप महापालिकेच्या रुग्णालयांकडे वळत आहेत. प्रसूतिपश्‍चात सुविधा देण्यासाठीही महापालिकेने विविध योजनेंतर्गत सुविधा केली आहे. त्याचाही फायदा रुग्णांना मिळू लागला आहे. 

आकडे बोलतात.... 
(एप्रिल ते ऑगस्ट 2018) 
ओपीडी - 25,437 
सोनोग्राफी - 3264 
कुटुंब नियोजन - 1253 

महापालिकेच्या तीन प्रसूतिगृहांत सोनोग्राफीची सोय आहे. याशिवाय, विविध आजारांवरील उपचारांचीही सुविधा आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही केली जाते. हे सर्व मोफत असल्याने गरीब रुग्णांची सोय झाली आहे. 
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com