आपत्तीत सोलापुरात  103 आश्रयस्थाने 

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 23 मे 2018

सोलापूर - पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला तोंड देण्यासाठी शहरात 103 ठिकाणी आश्रयस्थाने निश्‍चित केली आहेत. त्यात महापालिकेच्या शाळांसह खासगी मंगल कार्यालये, खासगी शाळा, मोठ्या इमारती आणि मोकळ्या मैदानांचा समावेश आहे. महापालिकेने २०१८ साठी तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात ही माहिती देण्यात आली. 

सोलापूर - पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला तोंड देण्यासाठी शहरात 103 ठिकाणी आश्रयस्थाने निश्‍चित केली आहेत. त्यात महापालिकेच्या शाळांसह खासगी मंगल कार्यालये, खासगी शाळा, मोठ्या इमारती आणि मोकळ्या मैदानांचा समावेश आहे. महापालिकेने २०१८ साठी तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात ही माहिती देण्यात आली. 

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नगरअभियंता कार्यालयाने हा आराखडा तयार केला आहे. त्यात नैसर्गिक संकटाची स्थिती निर्माण होऊ शकेल, अशा ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेतील अधिकारी, त्यांच्याकडील जबाबदारी, त्यांचे संपर्क क्रमांक यांचा समावेश आहे. आपत्तीच्या कालावधीत उपलब्ध असणारी औषधे, उपचाराची सुविधा असलेली दवाखाने, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक, गेल्या काही वर्षांतील आपत्तीच्या घटनांचीही माहिती देण्यात आली आहे. 

अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून तेथील नागरिकांची पर्यायी व्यवस्था प्रस्तावित आहे.  शहरातील अतिधोकादायक इमारती आणि दुर्घटना झाल्यास तेथील लोकांना स्थलांतरित करायच्या जागा, यांचीही यादी तयार केली आहे. महापालिकेच्या शाळांसह खासगी मंगल कार्यालये, खासगी शाळा, मोठ्या इमारती आणि मोकळ्या मैदानांचा समावेश आहे. शहरातील पाच शाळांमध्ये नागरिकांना सुविधा देणे शक्‍य असल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यामध्ये रामलाल चौकातील महापालिका शाळा क्रमांक 18, एसटी स्थानक परिसरातील शाळा क्रमांक 27, जयभवानी शाळा, भवानी पेठ, कॅम्प स्कूल, केंगनाळकर शाळा हद्दवाढ भाग यांचा समावेश आहे. 

याशिवाय अंत्रोळीकरनगरमधील उद्यान व खुली जागा, राहुल सोसायटी, प्रगती सोसायटी, आराधना सोसायटीमधील खुली जागा, भाग्योदय सोसायटीतील खुल्या जागेचा समावेश आहे. विभागीय कार्यालयानुसार ही यादी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक झोनअंतर्गत असलेल्या पोलिस चौकी व ठाण्यांचीही माहिती देण्यात आली आहे. 

विभागीय कार्यालयानुसार शाळांची संख्या 
विभाग शाळा खोल्या 
01 05 21 
02 01 02 
03 15 36 
04 04 (पूर्ण शाळा) 
05 29 98 
06 07 32 
07 36 (पूर्ण शाळा) 
08 06 (पूर्ण शाळा)

Web Title: solapur news 103 shelters in distress in Solapur